Twitter हा एक मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. एलॉन मास्क हे ट्विटरचे सीईओ आहेत. एलॉन मस्क सीईओ झाल्यापासून त्यांनी कंपनीमध्ये अनेक निर्णय घेतले आहेत. सशुल्क वापरकर्त्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध असल्याचे ट्वीटर सुनिश्चित करत आहे. कंपनीने ब्लू सबस्क्रायबर्ससाठी ट्विट लिहिण्यासाठी असलेल्या शब्दमर्यादेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विटरवर आधी वर्षाच्या सुरुवातीला ट्विट लिहिण्याची शब्दमर्यादा ४ हजार इतकी होती. त्यानंतर त्यामध्ये वाढ करून १० हजार इतकी करण्यात आली होती. आता नवीन निर्णयानुसार ही वाढ २५ हजार इतकी करण्यात आलेली आहे. ट्वीटरने ब्लू सबस्क्रायबर्ससाठी शब्दमर्यादा वाढवण्याची तिसरी वेळ आहे. याबद्दल ट्वीटरच्या इंजिनिअर प्राची पोद्दार यांनी ट्विट करून ही बातमी दिली आहे. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : अनलिमिटेड कॉलिंग,४० जीबी बोनस डेटा आणि…; Reliance Jio च्या ८४ दिवसांच्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळतात अनेक फायदे

२०१७ मध्ये ट्वीटरने शब्दमर्यादा १४० वरून २८० पर्यंत वाढवली होती. या निर्णयावर अनेक मिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. काही वापरकर्त्यांनी शब्दमर्यादा वाढवून त्यांचे विचार अधिक व्यापकपणे व्यक्त करण्याची परवानगी दिल्याबद्दल कौतुक केले होते. तर प्लॅटफॉर्मची संक्षिप्तता हे त्याचे परिभाषित फिचर आहे त्याच्याशी तडजोड केली जाऊ नये असा युक्तिवाद वापरकर्त्यांनी केला होता. आता ट्वीटरने ट्विट लिहिण्याची शब्दमर्यादा २५ हजार केल्याच्या केल्याच्या वापरकर्ते निर्णयाला वापरकर्ते कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणे मनोरंजक असेल.

गेल्या महिन्यामध्ये ही व्हिडिओसाठीची मर्यादा दोन तासांपर्यंत वाढवण्यात आली होती. ज्यामुळे दुर्दैवाने वापरकर्त्यांना नवीन रिलीज झालेला पूर्ण चित्रपट लीक करण्याची संधी मिळाली होती. अलीकडेच “द फ्लॅश” हा चित्रपट प्लॅटफॉर्मवर लीक झाला होता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter increase character limit 25000 for write tweet for blue subscribers users check details tmb 01