मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर जगातील अनेक देशांनी बंदी घातली आहे. यात चीन, इराण, म्यानमार, उत्तर कोरिया, रशिया आणि तुर्कमेनिस्तान यांचा समावेश आहे. पाश्चात्य देशांच्या निर्बंधांना उत्तर देण्यासाठी या देशांनी ट्विटरवर बंदी घातली आहे. पण ट्विटरचे डार्क वेब व्हर्जन रिलीज झाल्यानंतर आता या देशांतील युजर्सही ट्विटरचा वापर करू शकतील आणि त्यांची भावना जगासमोर मांडू शकतील. चला जाणून घेऊया ट्विटरच्या डार्क वेब व्हर्जनबद्दल…
ट्विटरने म्हटले आहे की, रशियासह इतर देशांमध्ये सेन्सॉरशिप टाळण्यासाठी, डार्क वेब जारी केले आहे. याचा वापर टोर ओनियन सेवेद्वारे केला जाऊ शकतो. वास्तविक, टोर ओनियन सेवा सेन्सॉरशिपची बंधनं दूर युजर्संना ट्विटरवर प्रवेश प्रदान करते. त्यासायबर सुरक्षा संशोधकाच्या मते, सेन्सॉरशिप देशांमध्ये ट्विटर वापरण्यासाठी टॉर नेटवर्कचा वापर करावा लागेल. टॉर हे एक सुरक्षित नेटवर्क आहे जे वेगवेगळ्या सर्व्हरद्वारे इंटरनेट कनेक्शनद्वारे कार्य करते. जगभरातील काही युजर्स आपल्या गरजेनुसार वापरतात. सोप्या भाषेत बोलायचं तर त्याला हॅकर असेही म्हणता येईल. ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमचा प्रयत्न आहे की, आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ट्विटर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
मेटा-मालकीची कंपनी फेसबुकने २०१४ मध्ये स्वतःची टोर आवृत्ती लॉन्च केली. यानंतर ट्विटरनेही अशी सेवा सुरू केली आहे. त्याच वेळी, ट्विटरने सांगितले की त्यांनी सेन्सॉरशिपपासून संरक्षण करण्यासाठी या नेटवर्कद्वारे डेटाची गोपनीयता एक साधन म्हणून विकसित केली आहे.