मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नवीन सीईओच्या नावाची घोषणा केली आहे. लिंडा याक्करिनो या ट्विटरच्या नवीन सीईओ असणार आहेत. पुढील सहा आठवड्यात लिंडा याक्करिनो ट्विटरच्या सीईओ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी शुक्रवारी ट्वीट करत याबाबतची घोषणा केली.

मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं,”मी ट्विटरच्या नवीन सीईओ म्हणून लिंडा याक्करिनो यांचं स्वागत करण्यास उत्सुक आहे. लिंडा प्रामुख्याने व्यवसायिक संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित करेल, तर मी उत्पादन डिझाइन आणि नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेन. आताच्या प्लॉटफॉर्मचं रुपांतर ‘X’ (X/Twitter) मध्ये करण्यासाठी मी लिंडाबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.”

Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Aishwarya Narkar
“ही विकृती…”, सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मी ब्लॉक केलं म्हणून तो माणूस…”
Deepika Padukone salm L and T chairman SN Subrahmanyan
Deepika Padukone : “एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक…”, दीपिकाची L&T अध्यक्षांच्या रविवारी काम करण्याच्या सल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया
Punha Kartvya Aahe
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत होणार नवीन एन्ट्री; ‘या’ जेष्ठ अभिनेत्री दिसणार गुरूमाँच्या भूमिकेत
Canadian Prime Minister Justin Trudeau announces resignation as Liberal Party leader and Prime Minister
ट्रुडो यांची राजीनाम्याची घोषणा; पक्षाने नवीन नेता निवडल्यानंतर पंतप्रधानपद सोडणार
Loksatta vyaktivedh Actress Demi Moore autobiography Inside Out
व्यक्तिवेध: डेमी मूर
Karuna Munde Said Thanks to Suresh Dhas
Karuna Munde : करुणा धनंजय मुंडेंनी मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाल्या, “माझ्याकडे खूप पुरावे……”

हेही वाचा : Twitter New CEO: लिंडा याक्करिनो बनणार ट्विटरच्या नवीन सीईओ, एलॉन मस्क यांनी केली घोषणा

लिंडा याक्करिनो यांनी त्यांची ट्विटरच्या सीईओ पदासाठी निवड झाल्यावर हे ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणाल्या, ”उज्वल भविष्यासाठी मस्क यांच्याकडे असलेल्या विचारांनी मला प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या धाडसी व्हिजनला अनुसरुन ट्विटरमध्ये नवे योग्य बदल करण्यासाठी आणि हा व्यवसाय एकत्रितपणे पुढे नेण्यासाठी मी उत्सुक आहे.”

हेही वाचा : आता IPL २०२३ चा अधिक आनंद लुटता येणार; Jio च्या ‘या’ रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा आणि…

लिंडा याक्करिनो म्हणाल्या , ट्विटर २.० तयार करण्यामध्ये वापरकर्त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. याकारिनो अशा वेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी स्वीकारणार आहेत जेव्हा या प्लॅटफॉर्ममध्ये जाहिरातीच्या कमाईमध्ये घट होत आहे आणि त्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्विटरच्या जाहिरातीच्या कमाईमध्ये तीव्र घट झाल्याचे एलॉन मस्क यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते.

Story img Loader