सध्या ट्विटरवर कोणीही तुम्हाला कोणत्याही ट्वीटमध्ये किंवा कमेंटमध्ये टॅग करू शकते. पण लवकरच ट्विटरवर एक नवे फीचर येणार आहे. या फीचरमुळे तुम्हाला कोण टॅग करू शकते यावर नियंत्रण मिळवता येणार आहे. या नव्या फीचरबाबत ॲप रिसर्चर जेन मन्चुन वॉंग यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या नव्या फीचरमुळे युजर्सना त्यांना कोण टॅग करू शकते हे ठरवता येणार आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीला तुम्हाला टॅग करण्यापासून पूर्णतः ब्लॉक करण्याचा पर्याय देखील या फीचरमुळे उपलब्ध होणार आहे. हे फीचर टॉगलच्या स्वरूपात ट्विटरवर उपलब्ध होणार आहे. या ट्वीटमधून तुम्हाला नवे फीचर कसे दिसेल हे जाणून घेता येईल.

आणखी वाचा : BSNL ने लाँच केले २६९ आणि ७६९ रुपयांचे नवे रिचार्ज प्लॅन; यावर काय ऑफर आहे लगेच जाणून घ्या

ट्विटरचे नवे फीचर :

याआधी ट्वीटवर कोण रिप्लाय करू शकेल, याबाबत देखील असे एक फीचर २०२० मध्ये रोल आऊट करण्यात आले होते. तसेच यावर्षी ‘ट्विटर सर्कल’ हे नवे फीचर लवकरच येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या फीचरमुळे तुमचे ट्वीट कोण पाहू शकते हे ठरवता येणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter new feature will soon let you control who can mention you in tweets pns