२०० दशलक्ष युजर्सचा डेटा हॅक झाल्याचा आरोप ट्विटरने फेटाळला आहे. ऑनलाईन विकला जाणारा डेटा हा ट्विटरचा असल्याचा दावा ट्विटर कंपनीने फेटाळून लावला आहे. सायबर सुरक्षातज्ज्ञ अॅलॉन गॅल यांनी गेल्या आठवड्यात असा दावा केला होता की, त्यांनी चोरी झालेल्या डेटाचा शोध लावला होता त्यात २०० दशलक्ष ट्विटर युजर्सचे ईमेल अॅड्रेस होते. त्यांनी दावा केला की, या उल्लंघनामुळे नंतर हॅकिंग, डॉक्सिंग आणि लक्ष्यित फिशिंगसारखे इतर ऑनलाइन गुन्हे होऊ शकतात. त्यांनी या बाबतीत कंपनीला सावधान केले होते.
या सगळ्यावर ट्विटरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऑनलाईन विकला जाणारा डेटा हा ट्विटर सिस्टीमला हॅक करून विकला जात आहे याचा पुरावा कंपनीला मिळाला नाही. युजर्सच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याची आमची जवाबदारी आम्ही अतिशय गांभीर्याने पार पडतो. आम्ही या वर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या घटनेबद्दल अपडेट शेअर करू शकतो आणि त्यावर उपाय करण्यासाठी आम्ही उचलली पावले यामध्ये पारदर्शकता आणू इच्छितो असे Twitter ने म्हटले आहे.
२०२२ मध्ये ट्विटरला सिस्टीम हॅक झाल्याचबद्दल सूचना मिळाली होती. सिस्टीम ऑटोमॅटिक स्वरूपात सांगते की कोणता ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कोणत्या खात्याशी जोडलेला आहे. ट्विटरला जुलै २०२२मध्ये हॅकर्सनी या त्रुटींचा फायदा घेतल्याचे लक्षात आले होते की डेटा आणि मोबाईल नंबर अशी युजर्सची माहिती काढून ऑनलाईन विकण्यात आली आहे. ज्या युजर्सच्या अकाउंटवर हा परिणाम झाला अशा युजर्सना ट्विटरने सूचित केले होते. ट्विटरने आपल्या फ्रेश पोस्टमध्ये म्हटले आहे की बगमुळे ५.४ दशलक्ष खात्यांचा डेटा प्रभावित झाला आहे आणि तो निश्चित करण्यात आला आहे.