Twitter Suicide Prevention Feature : ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी अलीकडे ट्विटर युजर्ससाठी अनेक फीचर्स लाँच केले आहेत. ट्विटरने नुकतेच व्ह्यू काउंट फीचर सादर केले आहे. या फीचरद्वारे युट्यूबप्रमाणे तुमच्या ट्विटला किती लोकांनी पाहिले हे तुम्हाला कळणार, तर गुंतवणूकदारांसाठी फायनान्शियल फीचर सादर केले असून यात ट्विटमध्ये आवडत्या स्टॉकपुढे $” हे चिन्ह लावल्यास त्याच्या किंमतीपासून ते इतर माहिती मिळणार आहे. मात्र, फीचर्स देत असताना मस्क यांनी एक महत्वाचे समजले जाणारे फीचर बंद केले, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.
अहवालानुसार, आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांना पुनर्निर्देशित करण्यासाठी डिझाईन केलेले फीचर बंद करण्यात आले आहे. मस्क यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
(धोकायदायक ठरू शकतात ही Electronic Devices, घरात असेल तर ताबडतोब काढून टाका)
Suicide prevention feature विशिष्ट सामग्री शोधत असलेल्या वापरकर्त्यांसाठी आत्महत्या प्रतिबंध हॉटलाइन आणि इतर सुरक्षा संसाधनांना प्रोत्साहन देत होती. अहवालात हे फीचर हटवण्याशी संबंधित दोन लोकांचा उल्लेख आहे ज्यांनी मस्ककडून सूड घेण्याच्या भीतीने निनावीपणे माहिती दिली. मस्क हे फचर हटवण्याचे आदेश का देईल? याबाबत रॉयटर्स ताबडतोब तथ्य मांडू शकली नाही.
मस्क यांनी शुक्रवारी #ThereIsHelp फीचर हटवण्याचे आदेश दिले. युजरने विशिष्ट सामग्री शोधल्यास हे फीचर आत्महत्या थांबवण्यासाठी हॉटलाइन्स आणि इतर माहिती देते. ट्विटरच्या ट्रस्ट आणि सुरक्षा प्रमुख एला इर्विन यांनी रॉयटर्सला याबाबत स्पष्टीकरण दिले. आम्ही आमचे प्रॉम्प्ट सुधारत आहोत. ते करत असताना आम्ही त्यांना केवळ तात्पुरते काढले आहे, असे एला यांनी रॉयटर्सला सांगितले. पुढील आठवड्यात ते पुन्हा सुरू होतील, अशी अपेक्षा करतो, असेही त्या म्हणाल्या.
(Christmas 2022 : ख्रिसमसचा आनंद आणखी वाढवतील हे बजेट फ्रेंडली Gadgets, प्रियजनांना द्या गिफ्ट)
फीचर हटवल्याने चिंता व्यक्त होत आहे
सुसाइड प्रिव्हेन्शन फीचर हटवल्यापासून असुरक्षित वापरकर्त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता वाढली आहे. एरलियानी अब्दुल रहमान, जे अलीकडेच विसर्जित झालेल्या ट्विटर सामग्री सल्लागार गटावर होते, त्यांनी रॉयटर्सला सांगितले की #ThereIsHelp काढून टाकणे अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे.
मस्क चांगल्यासाठी ट्विटरमध्ये बदल घडवत आहेत, असे बोलणाऱ्यांनी आता तोंड बंद ठेवले पाहिजे, असे पत्रकार विल ग्युएट यांनी ट्विट केले.