मेटा कंपनीने ट्विटरला टक्कर देण्यासाठी आपले Threads App लॉन्च केले आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. हे App वापरकर्त्यांना फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या अकाउंट्सना परवानगी देणार आहे. मात्र ट्विटर अलीकडेच लॉन्च करण्यात आलेल्या थ्रेड्स अॅपमुळे फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे. नक्की हे काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ट्विटरचे वकील अॅलेक्स स्पिरो यांनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पाठवलेले पत्र न्यूज प्लॅटफ्रॉम Semafor ला प्राप्त झाले आहे. मेटाने थ्रेड्स डेव्हलप करण्यासाठी ट्विटरचे ट्रेड सिक्रेट्स आणि बौद्धिक संपत्तीचा वापर केल्याचे त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
स्पिरो यांच्या म्हणण्यानुसार, एलोन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर केलेल्या कर्मचारी कपातीनंतर मेटाने मोठ्या संख्येमध्ये अनेक माजी ट्विटर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. या पत्रामध्ये दावा करण्यात आला आहे की, हे माजी ट्विटर कर्मचारी अजूनही ट्विटरचे ट्रेड सिक्रेट्स आणि गोपनीय माहिती जाणतात. ट्विटरचा आरोप आहे की मेटाने या कर्मचाऱ्यांना “कॉपीकॅट” अॅप डेव्हलप करण्याचे काम देऊन या या परिस्थितीचा फायदा घेतला. त्यामुळे स्टेट आणि फेडरल कायद्यांचे उल्लंघन झाले आहे.
”आपल्या बौद्धिक संपत्तीच्या अधिकारांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा ट्विटरचा मानस आहे. तसेच मेटाने ट्रेड सिक्रेट्स आणि गोपनीय माहितीचा वापर थांबवण्यासाठी त्वरित पावले उचलावीत.” असे स्पिरो यांनी पत्रात लिहिले आहे. या आरोपांच्या प्रत्युत्तरात ट्विटर civil remedies आणि injunctive relief या दोन्ही स्वरूपात कायदेशीर कारवाईची धमकी मेटाला देत आहे. मेटाने ट्रेड सिक्रेट्स आणि गोपनीय माहितीचा वापर त्वरित थांबवावा अशी ट्विटरची मागणी आहे. मेटा ट्विटरचा डेटा क्रॉल किंवा स्क्रॅप करण्यासाठी अधिकृत नाही असे ट्विटरचे स्पष्ट म्हणणे आहे.
तथापि, मेटाने कम्युनिकेशन डायरेक्टर अँडी स्टोन यांच्याद्वारे थ्रेड्सवर एका पोस्टच्या माध्यमातून ट्विटरच्या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. थ्रेड्स टीममधील कोणत्याही इंजिनिअरने यापूर्वी ट्विटरसाठी काम केलेले नाही असे सांगून स्टोन यांनी ट्विटरच्या दाव्याचे खंडन केले. कायदेशीर वाद असूनदेखील मेटाने थ्रेड्स लॉन्च केले आहे. लॉन्च झाल्यापासून २४ तासांपेक्षा कमी वेळेत ३० मिलियनपेक्षा अधिक वापरकर्त्यांची थ्रेड्स वापरण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : VIDEO: रिअलमीने भारतात लॉन्च केले ‘हे’ दोन स्मार्टफोन्स; डिस्काउंट मिळवायचा असल्यास…
एलॉन मस्क यांनी ट्विटरवर या सर्व विषयावर भाष्य करताना म्हटले, ”स्पर्धा ठीक आहे, फसवणूक नाही.” मस्क यांच्या या प्रतिक्रियेमुळे दोन्ही कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या वादाला आणखीन खतपाणी घातले आहे.