ट्विटरवरील निलंबित खाती पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार असल्याचं एलॉन मस्क यांनी जाहीर केलं आहे. ट्विटरवरील निलंबित खाती पुन्हा सुरू करावीत की नाही, यासाठी पोल घेण्यात आला होता. या पोलच्या सकारात्मक निकालानंतर निलंबित खात्यांना माफी देत ही खाती लवकरच सक्रीय करण्यात येणार आहे.
Elon Musk: ट्विटर संपणार म्हणणाऱ्यांना एलॉन मस्क यांचा उलट सवाल; म्हणाले, “ट्विटरने आत्तापर्यंत…”
कायद्याचं उल्लंघन न करणाऱ्या आणि स्पॅमसारख्या गैरप्रकारामध्ये सहभागी नसलेल्या युजर्सची निलंबित ट्विटर खाती पुन्हा सुरू करावीत का? असा प्रश्न एलॉन मस्क यांनी युजर्संना विचारला होता. ३.१६ दशलक्षाहून अधिक युजर्संनी या पोलमध्ये भाग घेतला होता. त्यातील ७२.४ टक्के युजर्सने निलंबित खाती पुन्हा सुरू करण्याच्या बाजुने कौल दिला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं निलंबित ट्विटर खातं पुन्हा सुरू करावं का? यासाठीही एलॉन मस्क यांनी पोल घेतला होता. या पोलच्या सकारात्मक प्रतिसादानंतर २२ महिन्यांपासून निलंबित असलेलं ट्रम्प यांचं ट्विटर खातं सुरू करण्यात आलं आहे. मात्र, आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परतण्यास रस नसल्याचं ट्रम्प यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे.
आयफोन अनलॉक करणाऱ्या पहिल्या हॅकरला मिळाली ट्विटरमध्ये १२ आठवड्यांची इंटर्नशिप
एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच या कंपनीत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. कंपनीची सूत्र हाती घेताच मस्क यांनी साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. “कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी ठेवा अथवा कंपनी सोडून जा”, असा इशारा ईमेलद्वारे एलॉन मस्क यांनी देताच कंपनीत राजीनामासत्र सुरू झाले आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करताच सर्वात आधी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली. त्यानंतर सीएफओ नेड सेगल, पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही डच्चू दिला. दरम्यान, अनेक भारतीयांच्या नोकरीवरही गदा आली आहे. ट्विटरने भारतातील जवळपास २५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे.