How Uber For Teens Works : शहरातील नागरिकांच्या सुविधा वाढविण्यासाठी वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये एसी ट्रेन, एसी बस, मेट्रो, मोनो रेल, ओला-उबर कॅबचा समावेश आहे. पण, ओला-उबर बुक करायची असेल तर घरातील मोठी मंडळीच सहसा कॅब बुक करतात. पण, आता उबरने भारतात त्यांची उबर फॉर टीन्स (Uber for Teens) ही सेवा देखील सुरू केली आहे.

तर या सेवेमुळे १३ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली राईड्स बुक करू शकतील. या फीचरचा उपयोग उद्देश किशोरवयीन मुलांना सुरक्षित प्रवास प्रदान करणे असा असणार आहे आणि पालकांना रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि अलर्ट सुद्धा दिले जाणार आहे.

भारतातील ३७ शहरांमध्ये उबर फॉर टीन्सचा (Uber for Teens) विस्तार

अमेरिका आणि युरोपच्या काही भागात लाँच केल्यानंतर, उबर हे फीचर दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकातासह भारतातील ३७ शहरांमध्ये आणणार आहे. पालक आता त्यांच्या किशोरवयीन मुलांना सुरक्षित आणि स्वतंत्र उबर राइड्सचा आनंद घेण्याची परवानगी देऊ शकतात.

किशोरवयीन मुलांसाठी उबर कसे काम करते?

तर पालक खालील स्टेप्स फॉलो करून किशोरवयीन मुलांसाठी उबर बूक करून देऊ शकतात…

तुमच्या किशोरवयीन मुलांना त्यांच्या खात्याचा वापर करून उबर ॲपवर इन्वाईट करा.
त्यानंतर किशोरवयीन मुलांना त्यांच्या पालकांच्या खात्याशी जोडलेले त्यांचे स्वतःचे उबर खाते तयार करावे लागेल.
त्यामुळे आता पालक त्यांचे स्थान ट्रॅक रिअल-टाइम अलर्ट मिळवू शकतात आणि त्यानंतर किशोरवयीन मुले राईड्स बुक करू शकतात.

तसेच पालक सुद्धा त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या वतीने देखील राईड्स बुक करू शकतात…

किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षा उपाय…

उच्च रेटिंग असलेले असाईन ड्रायव्हर्स किशोरवयीन राइडसाठी नियुक्त केले जातील .
राइड लोकेशन लॉक केले जातील, ज्यामुळे ड्रायव्हर्स लोकेशनमध्ये कोणताही बदल करू शकणार नाहीत.
अधिक सुरक्षिततेसाठी किशोरवयीन मुले राइड दरम्यान ऑडिओ रेकॉर्ड करू शकतात.
तसेच मुलांना फक्त मागच्या सीटवर बसण्याची परवानगी आहे आणि सीट बेल्ट अनिवार्य आहेत.

याव्यतिरिक्त, उबर रायडर्स पालकांच्या संमतीनेच इतर किशोरवयीन मुलांबरोबर (१३-१७ वयोगटातील) प्रवास करू शकतात. एकदा रायडर १८ वर्षांचा झाला की, त्यांचे उबर फॉर टीन्स अकाउंट आपोआप नियमित उबर अकाउंटमध्ये रूपांतरित होईल.