आज देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड(Adhar Card) हे सर्वात महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहे. तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर तुमची जवळपास सर्व सरकारी आणि निमसरकारी कामे पूर्ण होतात. परंतु, सध्या बनावट आधार कार्डची अनेक प्रकरणे समोर यायला लागली आहेत. सरकारच्या इशाऱ्यानंतरही काही लोक एकापेक्षा जास्त आधार कार्ड वापरत आहेत, जे चुकीचे आहे. अशाच प्रकारे आधार कार्डाची बनावट करणाऱ्यांवर सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आधार बनवणाऱ्या यूआयडीएआयने अशी आधार कार्ड ओळखणे आणि रद्द करणे सुरू केले आहे. अहवालानुसार, यूआयडीएआयने आतापर्यंत ६ लाखापेक्षा जास्त बनावट आधार कार्ड रद्द केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बनावट आधार कार्ड रद्द

बनावट आधार कार्ड रद्द झाल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभा अधिवेशनात दिली. ते म्हणाले की यूआयडीएआय कडून डुप्लिकेट आधारावर मोठी कारवाई केली जात आहे. त्याच वेळी, आधार कार्डमध्ये एक अतिरिक्त पडताळणी वैशिष्ट्य सादर करण्यात आले, ज्यामध्ये लवकरच आधार पडताळणीसाठी चेहरा वापरला जाईल.

( ही ही वाचा: Adhar Card प्रमाणे Pan Card ची कार्डची एक्सपायरी डेट असते का? जाणून घ्या)

तुमच्या चेहऱ्याचे होणार व्हेरिफिकेशन

हे लक्षात घेण्यासारखे आहे की आत्तापर्यंत आधार पडताळणी फक्त फिंगरप्रिंट आणि आयरिसच्या मदतीने केली जात होती. पण, येत्या काळात आधार पडताळणी फेशियल रेकग्निशनद्वारेही केली जाणार आहे. यूआयडीएआय द्वारा बनावट आधार कार्डला मार्केटमधून हद्दपार करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. यूआयडीएआय द्वारे आधार कार्ड मध्ये एक्स्ट्रा व्हेरिफिकेशन फीचर जोडले आहे. ज्यात फेस म्हणजेच चेहऱ्याचे लवकरच आधार व्हेरिफिकेशनचा वापर केला जाईल.

अवैध संकेतस्थळांना पाठवली नोटीस

मंत्री चंद्रशेखर म्हणाले की, यूआयडीएआयने बनावट वेबसाइट्सनाही नोटिसा पाठवल्या आहेत. ते म्हणाले की यूआयडीएआयने संबंधित वेबसाइटच्या मालकांना अशा प्रकारच्या अनधिकृत सेवा कोणत्याही प्रकारे प्रदान करण्यापासून रोखण्यासाठी नोटीस दिली आहे. तसंच जानेवारी २०२२ पासून अशी सेवा देण्यापासून रोखण्यात आलं आहे. या वेबसाइट्सकडे बायोमेट्रिक माहितीत बदल करणे किंवा मोबाइल नंबर जोडण्याचा अधिकार असणार नाही. तसंच जर कोणाला यात बदल करायचा असेल, तर त्यांनी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइट सोबत अधिकृत आधार सेंटर्सवर जावे लागणार आहे.

( ही ही वाचा: लवकरच लाँच होणार iPhone 14; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही)

आधार कार्ड खरे की बनावट तपासायचे कसे?

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in/aadhaarverification ला भेट द्यावी लागेल.
  • या वेबसाइटवर आधार पडताळणी पृष्ठ उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला एक मजकूर बॉक्स दिसेल जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
  • तुमचा आधारकार्ड मधील १२ अंकी आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला डिस्प्लेमध्ये दाखवलेला कॅप्चा टाकावा लागेल.
  • त्यानंतर Verify बटणावर क्लिक करावे लागेल.
  • जर तुमचा आधार क्रमांक बरोबर असेल तर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक दाखवला जाईल.
  • आधार क्रमांकाव्यतिरिक्त, खाली तुमचा संपूर्ण तपशील असेल. दुसरीकडे, जर क्रमांक बनावट असेल तर अवैध आधार क्रमांक लिहिला जाईल.