काही वर्षांपासून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बँकेचे सर्व व्यवहार ऑनलाईन झाले असल्यामुळे सामान्य आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार रोजच समोर येत आहेत. त्यामध्ये अनेक लोकांचे हजारो, लाखो रुपये पळवले जात आहेत. भारतात आधार कार्ड ही आपली ओळख आहे. आधार कार्ड कोणत्याही ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून वापरता येते. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक सावधगिरीचा इशारा दिला आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड अपडेट करण्याच्या उद्देशाने ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर ओळख किंवा ऍड्रेस प्रूफ शेअर करण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. प्राधिकरणाच्या मते, अशा प्रकारे कोणीही त्यांची कागदपत्रे उघड करण्याची आवश्यकता नाही. अशा तुम्हाला येणाऱ्या विनंत्या फसवणूक करणाऱ्या असू शकतात. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश
Pegasus logo
Pegasus : “तीनशे भारतीयांचे व्हॉट्सॲप क्रमांक….”, पेगाससवर अमेरिकन न्यायालयाच्या निकाल; काँग्रेसने डागली तोफ
A father's last advice before giving his heart to his son; A VIDEO that every father should show his coming-of-age child
“आयुष्यात पैसा, व्यसन…” मुलाला स्वत:चं हृदय देण्याआधी वडिलांचा शेवटचा सल्ला; वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावा असा VIDEO
Amit Shah
Amit Shah : अमित शाह यांचा आरोप, “काँग्रेसची भूमिका बाबासाहेब आंबडेकरांच्या विरोधातलीच, त्यांना भारतरत्न मिळू नये म्हणून..”
Suhas Kande and Chhagan Bhujbal
Suhas Kande : “छगन भुजबळांना त्यांच्या गद्दारीचं फळ मिळालं”, सुहास कांदेंची बोचरी टीका; आव्हान देत म्हणाले…
Manoj Jarange Chhagan Bhujbal
Manoj Jarange : “…मग फडणवीस त्यांना तुरूंगात फेकून देणार”, मनोज जरांगे यांचा भुजबळांबाबत मोठा दावा

हेही वाचा : Best Camera SmartPhones: शाओमी आणि ओप्पोसह ‘हे’ आहेत बेस्ट कॅमेरा क्वालिटी असलेले स्मार्टफोन्स, एकदा पाहाच

”UIDAI तुम्हाला कधीही ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचे #आधारला अपडेट करण्यासाठी आपल्या POI/POA कागदपत्रे शेअर करण्यासाठी सांगत नाही. तुमचे आधार एकतर #myAadhaarPortal द्वारे ऑनलाइन अपडेट करावे किंवा तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी.” आधार कार्ड जारी करणाऱ्या प्राधिकरणाने X (पूर्वीचे ट्विटर) वर अशी पोस्ट केली.

विशेषतः जर का आधार दहा वर्षांपेक्षा देखील आधी जारी करण्यात आले असेल आणि ते कधीही अपडेट केलेले नसेल तर UIDAI रहिवाशांना त्यांची माहिती पुन्हा प्रमाणात करण्यासाठी आयडेंटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ (PoI/PoA) ही कागदपत्रे अपलोड करण्यास प्रोत्साहित करत आहे.

Story img Loader