रशियाने कालपासून युक्रेनवर हल्ला केला आहे. सैन्याच्या हल्ल्यासोबतच मागील काही दिवसांपासून युक्रेनवर अनेक सायबर हल्लेही केले जात आहेत. युक्रेनच्या बँका आणि सरकार आणि संसदेच्या संकेतस्थळांवर सायबर हल्ला होत असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. या सर्व हल्ल्यांमध्ये ज्याची चिंता व्यक्त केली जात आहे ती म्हणजे वायपर मालवेअर (Wiper Malware). हा एक अतिशय धोकादायक व्हायरस आहे ज्याचा वापर या सायबर हल्ल्यांसाठी केला जात आहे. या व्हायरसबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे वायपर मालवेअर (Wiper Malware) ?

जसेच्या या व्हायरसचे नाव आहे तसेच हे काम करते. हा व्हायरस काही काळातच डिव्हाइसमधील डेटा वाइप करतो. म्हणजेच या व्हायरसच्या मदतीने हॅक केलेल्या डिव्हाइसमधून तात्काळ डेटा डिलीट केला जाऊ शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या व्हायरसच्या मदतीने हटवलेला डेटा रिस्टोअर करण्याचा कोणताही मार्ग नाही.

Ukraine War: युक्रेनच्या महिलांना मेसेज करतायत रशियन सैनिक; स्क्रीनशॉर्ट व्हायरल

आपण आतापर्यंत वाचत आलो आहोत की सायबर हल्ल्यामध्ये हॅकर्स अशा व्हायरसचा वापर पैसे चोरी करणे, डेटा मिळवणे किंवा सिस्टीमवर नियंत्रण मिळवण्यासाठी करतात. परंतु वायपर मालवेअर या व्हायरसचा वापर या गोष्टींसाठी केला जात नाही. या वायपर मालवेअरच्या माध्यमातून सिस्टीम पूर्णपणे नष्ट केली जाते. कदाचित म्हणूनच युद्धाच्या या वातावरणात रशिया युक्रेनविरुद्ध या व्हायरसचा वापर करत आहे. हा धोकादायक मालवेअर रिकव्हरी टूल्सवर हल्ला करण्यास देखील सक्षम आहे. दरम्यान, वायपर मालवेअरच्या माध्यमातून रशिया युक्रेनवर सायबर हल्ला करत असल्याचे मान्य करत नाही.