रशियाने युक्रेनमध्ये आपले हल्ले आणखी तीव्र केले आहेत. रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धामध्ये युक्रेनचं नेतृत्व त्यांचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की करत आहेत. देश सोडून पळून जाण्याची अमेरिकेचे ऑफर धुडकावून झेलेन्स्की यांनी आपण देशामध्येच राहणार असून रशियाविरोधात लढणार असल्याचं म्हटलंय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष सध्या जगभरातील नेत्यांना फोन करुन समर्थनाची मागणी करताना दिसत आहेत. तर
युक्रेनचे उपपंतप्रधान आणि युक्रेनचे डिजिटल परिवर्तन मंत्री मायखाइलो फेडोरोव्ह यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना एक खुले पत्र लिहिले आहे. फेडोरोव्हने हे पत्रही @FedorovMykhailo या त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. पत्रात कुक यांच्याकडे रशियामध्ये आयफोनची विक्री थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे अमेरिकेकडून रशियावर घातलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईल बळ मिळेल, असं सांगण्यात आलं आहे.
युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं अॅपलच्या सीईओंना खुलं पत्र, म्हणाले “तुम्हाला मान्य करावे लागेल…”
अॅपल ही रशियाला स्मार्टफोन पुरवठा करणारी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी आहे. स्टॅटकाउंटरच्या अहवालानुसार, रशियामध्ये अॅपल आयफोनचा बाजार हिस्सा २८.७२ टक्के आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-02-2022 at 09:25 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine vice prime minister mykhailo fedorov wrote an open letter to apple ceo rmt