Viral Video: ॲपलच्या उत्पादनांची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. अनेक फीचर्स असणाऱ्या ॲपलच्या उत्पादनांचा वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध कंपन्यांची स्मार्ट वॉचेस बाजारात उपलब्ध आहेत. पण, ॲपलचे हे स्मार्ट वॉच इतर कंपन्यांच्या तुलनेत थोडं वेगळं आहे. कारण हे स्मार्ट वॉच आरोग्याची काळजीही घेत असतात. तुम्ही रोज पायी किती चाललात, तुमच्या किती कॅलरीज खर्च होतात, तुमच्या हृदयाचे ठोके, तुमचा रक्तदाब किती आहे यांची माहिती वेळोवेळी देत असतात; तर आज यांच्यासंबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. तुम्ही आतापर्यंत अ‍ॅपलच्या स्मार्ट वॉचने (Apple Smart Watch) अनेक माणसांचा जीव वाचवला अशा घटना ऐकल्या असतील. पण, आज व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका सिंहाचे हार्ट रेट चेक करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅपल वॉच त्याच्या प्रगत आरोग्य निरीक्षण फीचर्ससाठी प्रसिद्ध आहे आणि आता ते मानवी वापराच्या पलीकडे त्याचे मूल्य सिद्ध करते आहे. म्हणजेच अलीकडेच ऑस्ट्रेलियातील जंगलातून अ‍ॅपल वॉचचा एक महत्त्वाचा प्रयोग करण्यात आला आहे. वन्यजीव पशुवैद्यक डॉक्टर क्लो ब्युटिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, सिंह या प्राण्याचे हार्ट रेट तपासण्यासाठी अ‍ॅपलच्या स्मार्ट वॉचचा एक अनोखा वापर करून दाखवला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक बेशुद्ध झालेला सिंह जमिनीवर पडलेला दिसत आहे. तसेच हार्ट रेट तपासण्यासाठी त्याच्या जिभेवर काळजीपूर्वक अ‍ॅपल वॉच ठेवून दिलं आहे आणि घड्याळाची स्क्रीन रिअल-टाइम हेल्थ मेट्रिक्स दाखवते आहे.

हेही वाचा…रिचार्ज न केल्यास तुमचा मोबाइल क्रमांक… TRAI चा ‘हा’ नवीन नियम पाहा; तुमच्या खिशावर पडेल भार

व्हिडीओ नक्की बघा…

डॉक्टर क्लो यांनी सांगितले की, त्यांनी आणि डॉक्टर फॅबिओला क्वेसाडा आणि डॉक्टर ब्रेंडन टिंडल यांनी वन्यजीव आरोग्य निरीक्षणासाठी Apple Watch वापरण्याची युक्ती शोधली आणि सांगितले की, अनेक उपकरणे प्राण्यांसाठी डिझाइन केलेली आहेत, त्यामुळे त्यांनी वन्यजीवांसाठी अ‍ॅपल वॉचच्या वापराला “गेम चेंजर” असे संबोधले आहे आणि हे घड्याळ केवळ सिंहांवरच नाही तर हत्तींवरही काम करते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वन्यजीव पशुवैद्यक डॉक्टर क्लो ब्युटिंग यांच्या अधिकृत @jungle_doctor या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, ‘मला माहीत नाही की आणखी काय प्रभावशाली असू शकते… सिंह या प्राण्याचे घोरणे हार्ट रेट अ‍ॅपलचे स्मार्ट वॉच मोजू शकते, जर तुम्ही सिहांच्या जिभेला हे स्मार्ट वॉच लावलं तर…’; अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे. एकूणच डॉक्टरांनी हा नवीन आणि अनोखा शोध लावला आहे, असे म्हणायला हरकत नाही.