मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी आपल्या प्लानच्या किंमती वाढवल्याने ग्राहक आता स्वस्त आणि मस्त प्लान शोधत आहेत. तिन्ही कंपन्यांचे दर आणि ऑफर्सची तुलना करत आहेत. आता जिओ युजर्ससाठी काही कॅशबॅक ऑफर आहेत. युजर्संना २०टक्के कॅशबॅक दिला जात आहे. येथे आम्ही तुम्हाला या कॅशबॅकचा फायदा कसा घ्यायचा, याबाबत जाणून घेऊयात.

Jio 299 Recharge Plan:२९९ रुपयांच्या जिओ रिचार्जवर २०% कॅशबॅक दिला जात आहे. या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये यूजरला दररोज २ जीबी हायस्पीड डेटा मिळेल. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत असेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध असतील. तसेच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शनही मिळेल. या प्लॅनमध्ये ६० रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे.

Jio 666 Recharge Plan: जिओच्या ६६६ रुपयांच्या रिचार्जवर २० टक्के कॅशबॅक दिला जात आहे. या प्लॅनची ​​वैधता ८४ दिवसांची आहे. यामध्ये यूजरला दररोज १.५ जीबी हायस्पीड डेटा मिळेल. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत असेल. यासोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शनही मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध असतील. या प्लॅनमध्ये १३३ रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे.

Photo: घर बसल्या ५० रुपयात मागवू शकता PVC आधार कार्ड; असा अर्ज करा

Jio 719 Recharge Plan: जिओच्या ७१९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता ८४ दिवस आहे. यामध्ये यूजरला दररोज १.५ जीबी हायस्पीड डेटा मिळेल. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत असेल. या प्लॅनमध्ये २० टक्के कॅशबॅक दिला जात आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध असतील. यासोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शनही मिळेल. या प्लॅनमध्ये १४४ रुपयांचा कॅशबॅक उपलब्ध आहे.

जिओ वापरकर्त्यांच्या खात्यात रिचार्ज केल्यानंतर ३ दिवसात कॅशबॅक मिळेल. यानंतर वापरकर्ते जिओ रिचार्ज, जिओ मार्ट, रिलायन्स मार्ट, रिलायन्स स्मार्ट, एजिओ, रिलायन्स ट्रेण्ड, रिलायन्स डिजिटल आणि नेटमेड्ससारख्या जिओ पार्टनर स्टोअर्समधून या कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात.

Story img Loader