Smartphone Offers: तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे, या फोनवर भन्नाट ऑफर्स देण्यात येत असून मोठ्या ऑफसह तुम्ही ते घरी आणू शकता. तुम्हाला नवीन Google Pixel 7 स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी मिळत आहे. फ्लिपकार्ट या फ्लॅगशिप फोनवर अनेक ऑफर देत आहे. Pixel 7 ही Google ची नवीनतम ऑफर आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर ५९,९९९ रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे, परंतु बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरसह, तुम्ही ४०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत डिव्हाइस मिळवू शकता.
काय आहे ऑफर ?
Google Pixel 7 फ्लिपकार्टवर ५९,९९९ रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे, परंतु जर तुमच्याकडे HDFC बँक कार्ड असेल, तर तुम्ही ७००० रुपयांच्या सवलतीसह डिव्हाइस मिळवू शकता. कारण HDFC क्रेडिट आणि डेबिट बँक कार्डवर ७००० रुपयांचा कॅशबॅक देत आहे. त्यामुळे किंमत ५२,९९९ रुपयांपर्यंत खाली येते.
फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या फोनवर १९,००० रुपयांपर्यंत ऑफर करत आहे. तुमच्याकडे iPhone 12 सारखा जुना iPhone आणि हाय-एंड Android फोन असल्यास, तुम्हाला एक्सचेंज बोनस म्हणून १८,००० पर्यंत मिळू शकतात. यामुळे फोनची किंमत ३४,९९९ रुपयांपर्यंत खाली आली आहे. तुमच्या फोनचे एक्स्चेंज व्हॅल्यू फोनचे मॉडेल, मेक वर्ष आणि कंडिशनवर आधारित असेल.
आणखी वाचा : Smart Tv Offer: केवळ सहा हजार ५९९ रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ LED Smart TV; पाहा कुठे मिळतेय ही भन्नाट ऑफर
Google Pixel 7 ची वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स आहेत. गुगलने नव्या पिक्सल 7 मध्ये टेन्सर G2 चिप दिली आहे. यामुळे हा फोन व्यवस्थितरित्या चालतो. लाईव्ह ट्रान्सलेट, गुगल असिस्टन्ट आणि वॉईस टायपिंग व्यवस्थितरित्या कार्य करतं. त्याचबरोबर पाच वर्षांचं सेक्युरिटी अपडेटची व्यवस्था आहे. गुगल पिक्सल 7 मध्ये असलेल्या टेन्सर G2 चिपसेटमुळे कॅमेऱ्या परफॉर्मन्स वाढला आहे. यात ड्युअल कॅमेरा सेट अप आहे. प्राथमिक कॅमेरा ५० एमपीचा असून १२ एमपीसह अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. त्याचबरोबर सिनेमॅटिक ब्लर व्हिडीओ मोड, फोटो अनब्लर, नाईट साईट असे नवे फीचर आहेत. गुगल पिक्सल 7 मध्ये 6.32 इंचाचा OLED डिस्प्ले असून ९० एचझेड रिफ्रेश रेट, ६.१ XDR OLED डिस्प्लेसह ६० HZ रिफ्रेश रेट आहे. गुगल पिक्सल 7 मध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.