Upcoming Phone Launches In India April 2025 : प्रत्येक महिन्यात नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. मार्चमध्ये गल, नथिंग व आयक्यू यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी पिक्सेल 9a, फोन 3a सीरिज व निओ 10R स्मार्टफोन लाँच केले. आज १ एप्रिल २०२५ आहे आणि या महिन्यात कोणते स्मार्टफोन लाँच होणार यावर एक नजर टाकू… तर स्मार्टफोन लाँचची सुरुवात उद्या म्हणजेच २ एप्रिल २०२५ रोजी होते आहे. उद्या मोटोरोला एज 60 फ्युजन लाँच होणार आहे. पोको ४ एप्रिल रोजी त्यांचा C71 स्मार्टफोन लाँच करील.
या महिन्यात भारतीय बाजारपेठेत येणाऱ्या स्मार्टफोन्सची माहिती खालीलप्रमाणे (Upcoming phone launches in India) :
पोको सी ७१ (Poco C71)
पोको सी ७१ स्मार्टफोन ४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता लाँच होईल. पोको सी७१ सह बजेट स्मार्टफोन लाइनअपचा विस्तार करण्यास सज्ज आहे.
मोटोरोला एज ६० फ्युजन (Motorola Edge 60 Fusion)
मोटोरोला २ एप्रिल २०२५ रोजी भारतात त्यांचे नवीन मॉडेल, मोटो एज ६० फ्युजन लाँच करण्याची तयारी करीत आहे. फ्लिपकार्टवरील पेजनुसार, या नवीन स्मार्टफोनमध्ये १.५ के ऑल-कर्व्हड एमोलेड डिस्प्ले असेल.
आयकू झेड1१० ५ जी (iQOO Z10 5G – iQOO Z10)
हा स्मार्टफोन ११ एप्रिलला लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन फक्त ०.७८९ सेमी लांबीचा असून, भारतातील सर्वांत पातळ स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. त्यात 7300 mAh ची प्रभावी बॅटरी आहे. हा स्मार्टफोन केवळ Amazon वर उपलब्ध असेल.
विवो टी ४ ५जी (Vivo T4 5G)
गेल्या मार्चमध्ये भारतात धुमाकूळ घालणाऱ्या T3 5G चा मोठा भाऊ म्हणून कंपनी Vivo T4 5G लाँच करण्याची तयारीत आहे.
पोको एफ७ अल्ट्रा (Poco F7 Ultra)
पोकोने जागतिक बाजारपेठेत आपला प्रमुख एफ७ अल्ट्रा लाँच केला आहे. त्यामध्ये अत्याधुनिक प्रोसेसर, आयपी६८ रेटिंग व ५० एमपी प्रायमरी सेन्सर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो आधीच लाँच झाला असला तरी भारतात तो या महिन्यात लाँच होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.
विवो व्ही ५० ई (Vivo V50e )
Vivo त्यांच्या V50 सीरिजमधील दुसरे मॉडेल V50e सादर करण्यास सज्ज आहे. लाँचिंगची नेमकी तारीख निश्चित झालेली नसली तरी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या मध्यात तो लाँच केला जाऊ शकतो.
सीएमएफ फोन २ (CMF Phone 2 )
नथिंग, त्यांच्या उप-ब्रँड CMF बरोबर लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. कंपनीने त्यांच्या इंडिया एक्स हँडलवरून एक टीझरदेखील शेअर केला आहे. नेमके नाव अधिकृतपणे उघड झालेले नसले तरी अनुमान असे सूचित करते की, CMF फोन २ लाँच होणार आहे.