युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट्स (UPI Payments) हा आजकाल डिजिटल व्यवहाराचा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती सहजपणे कुठेही पेमेंट करू शकते. ही पेमेंट पद्धत डिजिटायझेशनला चालना देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते आहे. या पद्धतीत आपण काही सेकंदात पैसे ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे आता तुम्ही क्रेडिट कार्डद्वारेही UPI पेमेंट करू शकता. युपीआय पेमेंटमुळे रोख रक्कम बाळगण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र कधीकधी हे पेमेंट अयशस्वी होते किंवा मध्येच अडकते. यामुळे अनेकदा पंचाईत होते. हे नेमके कशामुळे होते ? याची कारणे काय आहेत ते जाणून घेऊयात.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अचानक तुमचे युपीआय पेमेंट का अडकते. यामागे अनेक कारणे असू शकतात. चुकीचा युपीआय आयडी टाकणे,बँकेचा सर्व्हर डाऊन असणे, इंटरनेट नसल्यास अशा अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. यासाठी पेमेंट यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी आहे ज्या केल्यास तुमचे पेमेंट यशस्वी होऊ शकते. ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
तुमच्या डेली युपीआय पेमेंटची मर्यादा तपासावी
अनेक बँकांनी आणि पेमेंट गेटवेने दररोज किती रकमेचे पेमेंट युपीआयवरून करता येईल याच्या काही मर्यादा घातल्या आहेत. NPCI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका UPI व्यवहारात जास्तीत जास्त १ लाख रुपये इतके पेमेंट करता येते. तुमच्या पेमेंटची मर्यादा अपडेट होण्यासाठी तुम्हाला २४ तासांची वाट बघावी लागते.
तुमच्या UPI आयडीशी एकापेक्षा जास्त बँक अकाउंट लिंक करा.
UPI पेमेंट अयशस्वी होण्याचे किंवा पेमेंट मध्येच अडकण्याची मूळ कारण म्हणजे बँक सर्व्हर डाऊन असणे होय. बँक सर्व्हर बऱ्याच वेळा व्यस्त असण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी तुमच्या युपीआय आयडीशी एकापेक्षा जास्त बँक अकाउंट्स लिंक करणे उपयोगी पडू शकते. त्यामुळे तुमच्या बँकेचा सर्व्हर डाऊन झाल्यास, तुम्ही तुमच्या इतर लिंक असलेल्या बँक अकाउंटमधून पेमेंट करू शकता.
प्राप्तकर्त्याचे तपशील तपासा
युपीआय पेमेंट करताना ज्याला पैसे पाठवणार आहोत त्याचे बँक अकाउंट आणि IFSC कोड तपासूनच पेमेंट करावे असा सल्ला दिला जातो. पैसे पाठवताना चुकीचा IFSC कोड टाकल्यास किंवा चुकीचा अकाउंट नंबर टाकल्यास पेमेंट अयशस्वी किंवा मध्येच अडकण्याची शक्यता असते.
योग्य UPI क्रमांक टाका
आपल्याला हल्ली अनेक पासवर्ड लक्षात ठेवावे लागतात. फोनचा, एटीएमचा आणि ईमेल असं अन्य गोष्टींचा पासवर्ड लक्षत ठेवावा लागतो. त्यामुळे कदाचित तुम्ही तुमचा युपीआय विसरण्याची शक्यता असते. जर का तुम्ही तुमचा पिन विसरला असाल तर “Forget UPI PIN” वर क्लिक करून आणि कॉन्फिडेन्शियल पिन रिसेट करण्यासाठी स्टेप्स फॉलो करून पिन रिसेट करू शकता.
हेही वाचा : ‘हा’ व्हायरस अँड्रॉइडसाठी ठरतोय धोकादायक ! केंद्रीय यंत्रणांनी दिलाय धोक्याचा इशारा !
तुमचे इंटरनेट कनेक्शन तपासावे
इंटरनेट कनेक्शन हे युपीआय पेमेंट अडकण्याची सर्वात मोठी समस्या आहे. तुमच्या मोबाईलला इंटरनेट कनेक्शन स्ट्रॉंग नसल्यास कोणाचेतरी हॉटस्पॉट वापरून पेमेंट करावे. किंवा मोबाईल रिस्टार्ट करून पाहावा. जेणेकरून युपीआय पेमेंट करत असतं ते अयशस्वी किंवा मध्येच अडकणार नाही.