आजच्या काळात, आपले जवळजवळ प्रत्येक काम इंटरनेटद्वारे पूर्ण होते. आता आपण खरेदीला जातानाही पैसे घेऊन गेलो नाही तरीही काही हरकत नाही. कारण आता जवळपास सगळ्यांकडेच आपल्या स्मार्टफोनमध्ये युपीआय पेमेंट अ‍ॅप आहे. मात्र कधीकधी असेही होते की आपण दुकानात पेमेंट करायला जातो, पण इंटरनेट नीट काम करत नसल्याने आपल्याला पेमेंट करता येत नाही. ही गोष्ट खूपच लाजिरवाणी असते. असा पेच टाळण्यासाठी आपण एक ट्रिक जाणून घेणार आहोत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही इंटरनेटशिवायही युपीआय पेमेंट करू शकता.

इंटरनेटशिवायही करता येणार युपीआय पेमेंट

पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या तुमच्या युपीआय अ‍ॅप्सद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकता. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसे होऊ शकते. तर, तुम्ही तुमच्या पेमेंट अ‍ॅपवरून इंटरनेटशिवाय युपीआयवरून सहज पैसे ट्रान्सफर करू शकाल परंतु त्यासाठी तुमच्या फोनमध्ये नेटवर्क असले पाहिजे.

वेबसाइट खरी आहे की बनावट हे ओळखणे झाले सोपे; मिनिटांमध्ये कळणार सत्यता

मोबाईल डेटा किंवा इंटरनेटशिवाय पेमेंट करण्यासाठी, तुम्हाला युएसएसडी सेवा वापरावी लागेल. यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर ‘*99#’ डायल करावे लागेल. यानंतर तुम्हाला एक पॉप-अप मेनू दिसेल ज्यामध्ये तुम्हाला दिलेल्या अनेक पर्यायांपैकी पहिला पर्याय म्हणजे ‘सेंड मनी’ पर्याय निवडावा लागेल. आता, युपीआय आयडी, बँक खाते तपशील आणि मोबाइल नंबरसह पैसे पाठवण्याचे अनेक पर्याय दिसतील.

येथून पेमेंट मोड निवडा आणि नंतर आवश्यक तपशील भरल्यानंतर, तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत ते भरा. यानंतर, तुम्हाला फक्त तुमचा युपीआय पिन टाकावा लागेल आणि पैसे ट्रान्सफर करावे लागतील. अशा प्रकारे, तुम्ही इंटरनेटशिवायही तुमच्या स्मार्टफोनवरून युपीआय ​​ट्रान्सफर करू शकाल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमचा फोन नंबर युपीआयमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

Story img Loader