अमेझोन सेल सुरू झाला आहे. ग्राहक या सेलची मोठ्या आतूरतने वाट बघत होते. सेलमध्ये मोबाईलपासून ते टीव्ही पर्यंत अनेक उपकरणांवर मोठी सूट मिळत आहे. ग्राहकांची यात मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. दरम्यान तुम्ही चांगल्या ऑफरसह भन्नाट इयरबड घेण्याच्या विचारात असाल तर अमेझॉन तुमची ही इच्छा पूर्ण करत आहे. काही मोठ्या ब्रँड्सच्या इअरबडवर अमेझॉन सेलमध्ये ६९ टक्क्यांपर्यंतची सूट मिळत आहे. चला एक नजर या इअरबड्सवर टाकूया.

1) फायर बोल्ट बड १३००

Fire-Boltt Buds 1300 या इअरबडची मूळ किंमत ७ हजार ९९९ इतकी आहे. मात्र अमेझॉनकडून इअरबडवर ६९ टक्क्यांची भरघोस सूट देण्यात आली आहे. यानंतर हा इअरबड केवळ २ हजार ४९९ रुपयांमध्ये मिळत आहे. इतकेच नव्हे तर एसबीआयचे डेबिट कार्ड वापरल्यास ३०० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसेच एसबीआयचे क्रडिट कार्ड वापरल्यास १२५० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, तर एसबीआय क्रेडिट कार्ड इएमआय ट्रान्झॅक्शनवर १५५ रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. इअरबडमध्ये शक्तीशाली बेस, स्टुडिओ साउंड, २४ तासांपर्यंतची बॅटरी लाइफ मिळते. सिंगल चार्जमध्ये इअरबड ५ तास चालतो. केससह १५ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो.

२) एमआयव्हीआय ड्योओपॉड्स एम ४०

Mivi Duopods M40 या वायरलेस इअरबडवर चक्क ७० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. इअरबडची मूळ किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. मात्र मोठ्या सूट नंतर हा इअरबड केवळ १ हजार ४९९ रुपयांना मिळत आहे. फायर बोल्ट इअरबडला मिळाणारी सूट या इअरबडला देखील लागू आहे. हे बड्स २४ तासांच्या बॅटरी लाईफसह येतात.

३) ब्लाउपंक्ट बीटीडब्ल्यू ०७

Blaupunkt BTW07 या इअरबडची मूळ किंमत ५९९९ रुपये इतकी आहे. मात्र हा इअरबड १ हजार ९९९ रुपयांमध्य ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तसेच, एसबीआयचे डेबिट कार्ड वापरल्यास या फोनवर अजून ३०० रुपयांची तातडीची सूट मिळते. सिंगल चार्जमध्ये हा इअरबड ७ तासांपर्यंत चालतो. चार्जिंग केससह ४० तासांचा अतिरिक्त बॅकअप मिळतो.

४) टॅग रोग १०० जीटी

Tagg Rogue 100Gt या इअरबडची मूळ किंमत २ हजार ९९० रुपये आहे. या इअरबडवर ५७ टक्क्यांची सूट मिळत आहे. हा इअरबड केवळ १ हजार २९९ रुपयांना उपलब्ध झाला आहे. तसेच, एसबीआयचे डेबिट कार्ड वापरल्यास या इअरबडवर ३०० रुपयांची तातडीची सूट मिळते. गेमिंगसाठी हा इअरबड चांगला मानला जातो. तसेच इअरबडचा प्लेटाईम २० तासांचा आहे. १० मिनिट चार्ज केल्यास ३ तासांचा प्लेटाईम मिळत असल्याचा दावा अमेझॉनच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे.

Story img Loader