अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी AI बद्दल चिंता व्यक्त केली आहे. बायडेन म्हणाले की, AI समाजासाठी धोकादायक ठरू शकतो. मात्र टेक्नॉलॉजी समाजाला कसे प्रभावित करेल हे पाहणे बाकी आहे. याआधी ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क आणि Apple चे सह-संस्थापक यांनी AI बद्दल चिंता व्यक्त केली होती. मस्क यांनी तर शक्तिशाली AI चा विकास थांबवण्याचा इशाराही दिला आहे.
काय म्हणाले जो बायडेन
विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील अध्यक्षांच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी बायडेन म्हणाले की, त्यांची प्रॉडक्ट्स लोकांसाठी लॉन्च करण्यापूर्वी सुरक्षित आहेत याची खात्री करणे ही टेक कंपन्यांची जबाबदारी आहे. एआय धोकादायक आहे का असे विचारले असता बायडेन म्हणाले ते “पाहायचे बाकी आहे” परंतु “ते धोकादायक असू शकते”. याबाबतचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.
तसेच जो बायडेन पुढे म्हणाले, AI रोग आणि हवामान बदल यासारख्या आव्हानांना तोंड देण्यास मदत करू शकते. मात्र टेक्नॉलॉजीच्या विकसकांनी “आपल्या समाजासाठी, आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी संभाव्य जोखीम” पाहणे आणि संबोधित करणे आवश्यक आहे.
सोशल मीडियाचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम हे दर्शवितो की, सुरक्षिततेची उपाययोजना न केल्यास नवीन तंत्रज्ञानामुळे नुकसान होऊ शकते, असे जो बायडेन म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, ”सोशल मीडियाचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम हे दर्शवितो की, सुरक्षिततेची उपाययोजना न केल्यास नवीन तंत्रज्ञानामुळे नुकसान होऊ शकते.” एआयचे नियमन कसे करावे याबद्दल वाढत्या वादविवादादरम्यान बायडेन यांची टिपण्णी समोर आली आहे. अनेक टेक दिग्गजांनी सुरक्षा उपाय लागू होईपर्यंत Ai तंत्रज्ञानाचा विकास थांबवण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : Amazon layoffs: कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले; आता ‘इतक्या’ लोकांची होणार कपात, कारण…
मानवी-प्रतिस्पर्धी बुद्धिमत्तेसह AI सिस्टीम समाज आणि मानवतेसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शक्तिशाली AI सिस्टीम केवळ तेव्हाच विकसित केली पाहिजे जेव्हा खात्री असेल की त्याचा प्रभाव सकारात्मक असेल आणि त्यांचे धोके नियंत्रित केले जाऊ शकतात. त्यामुळे अनेक टेक दिग्गजांनी AI बंदीची मागणी केली आहे.