सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. OpenAI ने ChatGpt ची निर्मित केलीआहे. ऑटोमोबाईल कंपन्यांपासून ते स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपर्यंत सर्व घटक चॅटजीपीटी स्वीकारत आहेत. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्ही ChatGPT च्या मदतीने पैसे कमवू शकता. नक्की हे कसे शक्य आहे हे जाणून घेऊयात.

तुम्ही ChatGPT चा वापर करून पैसे कमवू शकता. तुम्ही जर का नोकरीच्या शोधात आहात किंवा नोकरी सोडू इच्छित असाल तर तुम्ही ChatGPT च्या AI च्या मदतीने सहज पैसे कमवू शकता.

हेही वाचा : ChatGpt News: गुगल इंजिनीअरने बनवले Gita Gpt; जाणून घ्या कोणत्या प्रश्नांची मिळणार उत्तरे

Editing Content

तुम्ही चॅटजीपीटी या चॅटबॉटला टेक्स्ट एडिट आणि योग्य करण्यासाठी सांगू शकता. यामुळे एडिटिंगचे काम सोपे होते. तसेच ब्लॉग सुरु करून ChatGPT वरून पैसे कमवता येतात. चॅटजीपीटी हे जवळपास कोणत्याही विषयावर विचार करू शकतो ज्याचा विचार तुम्ही करता. अशा स्थितीमध्ये ब्लॉग लिहिणे खूप सोपे आहे. तुम्ही ChatGPT ला कोणत्याही विषयावर ब्लॉग पोस्ट लिहिण्याची सूचना देऊ शकता आणि त्यासाठी शब्द मर्यादा देखील ठरवून देऊ शकता.

Writing Lyrics for Music or Poem

जसे ब्लॉग लिहून तुम्ही ChatGPT च्या मदतीने पैसा एकमवु शकता तसेच तुम्ही ChatGPT ला कोणत्याही विषयावर गाणी किंवा कविता लिहिण्यास सांगू शकता. जर तुम्हाला कविता किंवा गाण्याचे विशिष्ट वर्णन हवे असेल तर तुम्ही त्याच्याशी संबंधित सूचना देऊ शकता. यानंतर तुमचे काम सोपे होईल. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही ही युक्ती वापरू शकता.

हेही वाचा : पोपट विकल्यानं युट्यूबरला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय? वाचा…

SEO keywords

जर तुम्हाला तुमचे काम हे ऑनलाईन स्वरूपात करायचे असेल तर चांगले एसइओ किवर्ड असायला हवेत जेणेकरुन त्यामुळे लोकांना सहज शोधता येईल आणि वाचता येईल. तुम्ही ChatGPT ला तुम्हाला कीवर्ड रिसर्च आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) सेवा देण्यास सांगू शकता. या द्वारे देखील तुम्ही पैसे कमवू शकता.

Research

तुम्ही संशोधन कार्यासाठी चॅटजीपीटी देखील वापरू शकता.