आपण कामासाठी दिवसभर लॅपटॉप वापरतो तेव्हा बऱ्याचवेळा लॅपटॉप गरम झाल्याचे जाणवते. सततच्या वापरामुळे तो गरम होत असेल असे वाटून आपण त्याकडे सहज दुर्लक्ष करतो पण यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. त्यासाठी लॅपटॉप गरम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. पण यासाठी कोणते उपाय करता येतील हे बऱ्याच जणांना माहित नसते. लॅपटॉप दीर्घकाळासाठी नीट काम करावा, सतत गरम होऊ नये यासाठी कोणते उपाय करता येतील जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळीपासून संरक्षण करा
लॅपटॉपच्या आत व्हेंटिलेशन आणि उष्णता नियंत्रित करण्यासाठी सीपीयु पंखे असतात. काही काळाने या पंख्यांवर धुळ जमा होऊ शकते. त्यामुळे लॅपटॉपमध्ये व्यवस्थित व्हेंटिलेशन होत नाही आणि सतत गरम होतो. म्हणून लॅपटॉप सतत गरम होऊ नये यासाठी त्याचे धुळीपासून संरक्षण करा. तसेच लॅपटॉपमध्ये जमा झालेली धुळ साफ करण्यासाठी लॅपटॉप इंजिनिअरची मदत घेऊ शकता.

आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात

लॅपटॉपबरोबर मिळालेल्या चार्जरचाच वापर करा
चार्जर विसरल्यास काहीवेळा आपण ऑफिसमध्ये इतर सहकाऱ्यांच्या लॅपटॉपचा चार्जर वापरतो. अशावेळी लॅपटॉप गरम होण्याची शक्यता असते. त्यामुळे लॅपटॉपला नेहमी ओरीजिनल चार्जरने चार्ज करावे.

ओव्हर चार्ज करू नका
अनेकजणांना पुर्ण दिवस लॅपटॉप चार्जिंगला लावून काम करण्याची सवय असते, पण यामुळे लॅपटॉप गरम होऊन त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लॅपटॉपला ओव्हर चार्ज करू नये.

आवश्यक नसलेले ॲप्लिकेशन बंद करा
काम करत असताना एका वेळी अनेक ॲप्लिकेशन सुरू असतात यामुळे लॅपटॉप गरम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बॅकग्राऊंड मध्ये सुरू असणारे आवश्यक नसलेले ॲप्लिकेशन बंद करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use these easy tips to slove laptop overheating problem know more pns