पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात यावे असा नियम सरकारने जाहीर केला आहे. या नियमानुसार पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर बँकेच्या व्यवहारांमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वेळेत सर्वांना पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर तुम्हाला यासाठी वेळ काढणे कठीण असेल, तर घरबसल्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. कशी आहे ही प्रक्रिया जाणून घ्या.

या स्टेप्स वापरुन ऑनलाईन पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा

  • https://incometaxindiaefiling.gov.in/ ही आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट उघडा.
  • त्यावर रेजिस्टर केले नसेल तर आधी रेजिस्टर करा. तुमचा पॅन कार्ड नंबर इथे युजर आयडी असेल.
  • पासवर्ड, युजर आयडी आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  • तिथे तुम्हाला ‘लिंक आधार’ (Link Aadhar) हा पर्याय दिसेल. जर हा पर्याय दिसत नसेल तर मेन्यु > प्रोफाइल सेटींग्स > लिंक आधार या स्टेप्स वापरा.
  • त्यानंतर पॅन कार्डवरून लॉग इन केल्यामुळे तुमची जन्मतारीख, लिंग ही माहिती आपोआप भरली जाईल.
  • त्यांनंतर आधार कार्ड आणि पॅन कार्डचे डिटेल्स तिथे भरा.
  • जर हे डिटेल्स मॅच झाले तर ‘लिंक नाऊ’ हा पर्याय दिसेल तो निवडा.
  • यानंतर एका मेसेजद्वारे तुम्हाला आधार आणि पॅन लिंक झाले असल्याचे सांगण्यात येईल. अशाप्रकारे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता.

आणखी वाचा : Airtel च्या या प्लॅनमध्ये मिळवा अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह १६ ओटीटी ॲप्सचे मोफत सब्सक्रिपशन; जाणून घ्या किंमत

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची गरज काय
पॅन कार्ड आणि आधार कार्ड भारतीयांसाठी हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. कोणत्याही सरकारी कामासाठी हे दोन डॉक्युमेंट्स आवश्यल असतात, तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्डमुळे अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. बँकेच्या किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्डची गरज भासते. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्याने इनकम टॅक्स रिटर्नची प्रक्रिया करणे शक्य होते. त्यामुळे जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तरं शेवटच्या तारखेच्या आधी ते लिंक करणे आवश्यक आहे.