फेसबूक आणि इन्स्टाग्राम हे मेटा अंतर्गत येणारे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. यांना वापरकर्त्यांची सर्वाधिक पसंती आहे. दररोज वेगवेगळ्या प्रकारची माहिती, अनेक प्रकारचे आशय, जगभरातील विविध संस्कृतींबद्दलची माहिती असं बरच काही या दोन्ही ॲप्सवर शेअर केलं जातं.
त्यातच वापरकर्त्यांना अधिक आकर्षित करण्यासाठी मेटाद्वारे सतत नवनवे फिचर्स आणले जातात.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन्ही ॲप्स इंग्रजी भाषेत वापरले जातात. कारण जेव्हा आपण नवे अकाउंट सुरू करतो, तेव्हा डिफॉल्टमध्ये इंग्रजी भाषा सेट असते. यामुळे इंग्रजी न येणाऱ्यांना थोडी अडचण येते. ही अडचण दूर करण्याचा सोपा उपाय आहे, तो म्हणजे कंपनीकडून वापरकर्त्यांना त्यांची आवडती भाषा निवडण्याचा पर्याय आधीच देण्यात आला आहे. हा भाषा बदलण्याचा पर्याय कंपनीकडून देण्यात आला आहे हे बऱ्याच जणांना माहित नसते. त्यामुळे सर्वजण फक्त इंग्रजीमध्येच हे ॲप्स वापरतात. या ॲप्समधील भाषा कशी बदलायची जाणून घ्या.
आणखी वाचा – स्टीकर्स जोडून तुमची Instagram रील बनवा आणखीनच आकर्षक; जाणून घ्या स्टेप्स
फेसबूकमध्ये भाषा बदलण्याच्या स्टेप्स
- सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक ॲप उघडा.
- त्यानंतर उजव्या बाजूला सर्वात वर तीन आडव्या रेषा दिसतील, त्यावर क्लिक करून मेन्यूमध्ये जा.
- त्यानंतर मेन्यूमध्ये तुम्हाला शेवटी सेटिंग्स अँड प्रायव्हसी (Settings & Privacy) हा पर्याय निवडा
- त्यात पुन्हा सेटिंग्स पर्याय निवडा.
- त्यानंतर प्रेफरन्स (Preference) पर्याय निवडा.
- तिथे लॅंग्वेज अँड रीजन (Language and region) या पर्यायावर क्लिक करा आणि त्यातील पहिला पर्याय निवडा.
- त्यानंतर तिथे भाषांची यादी दिसेल, त्यातील तुमची आवडती भाषा निवडा आणि सेव्ह पर्यायावर क्लिक करा.
आणखी वाचा – कोणी गुपचूप तुमचा कॉल रेकॉर्ड करतय का? ‘या’ ट्रिक्स वापरून लगेच ओळखा
इन्स्टाग्राममध्ये भाषा बदलण्याच्या स्टेप्स
- स्मार्टफोनमध्ये इन्स्टाग्राम ॲप उघडा.
- त्यानंतर उजव्या बाजूला सर्वात खाली प्रोफाईल आयकॉनवर (Profile Icon) क्लिक करा.
- त्यामध्ये दिसणाऱ्या मेन्यू (Menu)आयकॉनवर क्लिक करा.
- आता सेटिंग्स (Settings) पर्याय निवडून अकाउंट (Account) पर्यायावर क्लिक करा.
- यामध्ये लॅंग्वेज (language) हा पर्याय निवडा, त्यामध्ये अनेक भाषांची यादी दिसेल. त्यातील तुमची आवडती भाषा निवडा. अशाप्रकारे या स्टेप्स वापरून तुम्ही इन्स्टाग्राम तुमच्या भाषेत वापरू शकता.