इन्स्टाग्राम हे मेटाचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इन्स्टाग्रामचे जगभरात लाखो युजर्स आहेत. या प्लॅटफॉर्मवरून फोटो, रील्स, व्हिडीओ असा कंटेन्ट शेअर करता येतो. युजर्सना आकर्षित करण्यासाठी इन्स्टाग्रामकडून सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. हे नवे फीचर्स वापरुन अधिकाधिक फॉलोवर्स वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. पण कधीकधी जेव्हा फॉलोवर्स कमी असतील तेव्हा लाईक्स आणि व्ह्यूजवरून आपल्या कंटेन्टची तुलना केली जाऊ नये असे अनेकांना वाटते. अशावेळी तुम्ही एक सोप्पी ट्रिक वापरून तुमच्या फोटो आणि व्हिडीओला मिळणारे लाईक्स, व्ह्यूज इतरांपासून लपवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही महिन्यांपुर्वी इन्स्टाग्रामकडुन एक नवे फीचर रोल आऊट करण्यात आले. या फीचरमुळे इन्स्टाग्रामवरील लाईक्स आणि व्ह्यूज लपवणे शक्य होते. कसे वापरायचे हे फीचर जाणून घ्या.

आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात

इन्स्टाग्रामवरील लाईक्स आणि व्ह्यूज लपवण्यासाठी या स्टेप्स वापरा

  • यासाठी तुमचे इन्स्टाग्राम प्रोफाईल उघडा. त्यामध्ये तीन आडव्या रेषा असणाऱ्या मेन्यु पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामधील सेटिंग्स पर्याय निवडा.
  • त्यानंतर प्रायवसी सेक्शनमध्ये जाऊन पोस्ट्स पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये ‘हाईड लाईक्स अँड व्ह्यू’ (Hide Likes and View) हा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या फोटो किंवा व्हिडीओला मिळालेले लाईक्स आणि व्ह्यूजकोणालाही दिसणार नाहीत.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use these steps to hide views and likes on instagram know more pns