मोबाईल हा इतर जीवनावश्यक वस्तुंप्रमाणे दैनंदिन जीवनात महत्वाचा झाला आहे. ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्यापासून बँकेचे व्यवहार करण्यापर्यंत आपण सतत मोबाईलचा आधार घेतो. या मिनी वरच्युअल मित्राशिवाय जगणे आता सर्वांना कठीण वाटू लागले आहे. पण कधीकधी मोबाईल जास्त दिवस वापरल्यानंतर तो स्लो होण्याची शक्यता असते. अशावेळी मोबाईल बिघडला आहे किंवा नवीन मोबाईल घेण्याची वेळ आली आहे असे वाटू शकते. पण फोन स्लो झाल्यानंतर लगेच बदलण्याची गरज नसते. काही कारणांमुळे फोन स्लो होऊ शकतो. ही समस्या सोडवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरता येतील जाणून घेऊया.
रॅम डिलिट करा
फोनमध्ये प्रत्येक गोष्ट स्टोर केली जाते आणि रॅममध्ये कॅशेच्या स्वरूपात सुरक्षित केली जाते. उदाहरणार्थ, तुम्ही वेबसाइट उघडल्यास, तुमचा फोन काही डेटा सेव्ह करेल जेणेकरून पुढच्या वेळी ते URL पटकन लोड होईल. फोन स्लो झाला असेल तर तुम्हाला फक्त कॅशे किंवा जंक फाइल्स क्लीन कराव्या लागतील. तुमच्या फोनवरील कॅशे डेटा साफ करण्यासाठी सेटिंग्ज > स्टोरेज > कॅशे > कॅशे क्लिन करा पर्याय > कन्फर्म हे पर्याय निवडा. ही पद्धत वापरल्याने फोनमधील काही रॅम डिलिट होईल आणि फोनचा वेग वाढेल.
आणखी वाचा : WhatsApp UPI Payment : ‘या’ स्टेप्स वापरून व्हॉटसअॅपवरून सहज करा पेमेंट
ॲप्स डिसेबल किंवा अनइंस्टॉल करा
आपण अनेकदा जेवण ऑर्डर करण्यासाठी, फोटो एडिट करण्यासाठी अनेक ॲप्स फोनमध्ये इन्स्टॉल करतो. या ॲप्समुळे फोन स्लो होण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त वापरात नसलेले ॲप्स अनइंस्टॉल करा. जर काही ॲप्स अनइंस्टॉल होत नसतील तर ते डिसेबल करा. ॲप्स डिसेबल करण्यासाठी सेटींग्स > ॲप्स अँड प्रोग्राम्स > जे ॲप डिसेबल करायचे आहे ते ॲप उघडा > डिसेबल पर्याय निवडा.
लेटेस्ट सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करा
अँड्रॉइड किंवा आयओएस (ios) कंपनीद्वारे नियमितपणे अपडेट जारी केला जातो. या अपडेटमुळे फोन व्यवस्थित चालतो. जर तुमचा फोन स्लो झाला असेल तर, तुम्हाला तो लेटेस्ट सॉफ्टवेअरमध्ये अपडेट करण्याची गरज आहे. यासाठी फक्त तुमचा फोन वायफायशी कनेक्ट करा, त्यानंतर सेटिंग्ज > सिस्टम अपडेट > अपडेट शोधा आणि इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरू करा ही प्रक्रिया करा.
आणखी वाचा : मोबाईलमधला डेटा संपला तरी वापरता येणार Free Internet? लगेच वापरून पाहा ‘ही’ ट्रिक
ॲप्सच्या लाईटर वर्जनचा उपयोग करा
कधीकधी काही ॲप्सच्या मोठ्या स्टोरेजमुळे फोन स्लो काम करू शकतो. यासाठी त्या ॲप्सचे लाईटर वर्जन वापरा. उदा. फेसबुक लाइट, इन्स्टाग्राम लाईट, गुगल गो ॲप्स अशा ॲप्सचा वापर तुम्ही करू शकता. यामुळे फोनचे स्टोरेज कमी वापरले जाईल आणि फोन स्लो होणार नाही.