एखादे ठिकाण आपल्याला आवडते किंवा कुठे जायचे असेल, तर तिथे कसे पोहोचायचे हे पाहण्यासाठी आपण गूगल मॅप्सचा वापर करतो. परंतु, तुम्हाला आवडणाऱ्या ठिकाणी परत परत जायचे असल्यास ती जागा लक्षात ठेवण्यासाठी तुमच्यासाठी, गूगल मॅप्सचे लोकेशन सेव्ह करून ठेवण्याचे फीचर फारच उपयुक्त ठरू शकते. गूगल आपल्या वापरकर्त्यांच्या सोईसाठी अॅप्समध्ये सतत नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. त्यामध्ये मॅप्सवरील एखादी जागा, ठिकाण तुम्ही सहज तुमच्या आवडत्या जागांच्या यादीत फोन किंवा डेक्सटॉपवर सेव्ह करून घेऊ शकता. मग तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा ते ठिकाण शोधणे सोपे होते. एवढेच नव्हे, तर इतरांनादेखील तुम्ही सेव्ह केलेले लोकेशन पाठवता येऊ शकते. हे कसे करायचे, ते पाहा. या सगळ्यासोबत शेवटी काही बोनस टिप्ससुद्धा दिल्या आहेत त्या पाहा.
आपल्या फोनवर आणि डेक्सटॉपवर लोकेशन कसे सेव्ह करायचे?
डेक्सटॉप
१. गूगल मॅप्सवर तुम्हाला हवे असलेले लोकेशन सर्च करा
२. स्क्रीनवर आलेल्या ठिकाणच्या नावाच्या किंवा लोकेशनच्या खाली बुकमार्कसारखे दिसणारे एक चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करून ते सेव्ह करा.
३. तुम्ही याआधी कोणती लिस्ट तयार केली असल्यास त्यामध्ये हे लोकेशन सेव्ह करा अथवा नवी लिस्ट बनवून, त्यामध्ये तुम्ही सर्च केली जागा सेव्ह करून ठेवा.
हेही वाचा : तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटला बनवा अधिक सुरक्षित आणि प्रायव्हेट! पाहा ‘प्रायव्हसी चेक’ हे फीचर कसे वापरायचे ते….
स्मार्टफोन [अॅण्ड्रॉइड आणि आयएसओ]
१. तुम्हाला हवे असलेले लोकेशन मॅप्सवर सर्च करा. किंवा मॅप्सवर दिसणाऱ्या जागेवर प्रेस करून, ती पिन करा.
२. स्क्रीनवर आलेल्या नावाच्या खाली तुम्हाला बुकमार्कसारखे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करून जागा सेव्ह करा.
३. तुम्ही याआधी तुमच्या आवडीच्या जागांची यादी तयार केली असेल, तर त्यामध्ये ही नवीन जागा अॅड करा किंवा नवीन लिस्ट बनवून, त्यामध्ये ही जागा अॅड करून डन या पर्यायावर क्लिक करा.
हेही वाचा : मेटाचे ‘हे’ ॲप बहुतांश वापरकर्त्यांना वाटते निरुपयोगी! पाहा काय आहे याचे कारण अन् इतर ॲप्सची यादी….
बोनस टिप्स
लेबल : तुम्हाला हव्या असणाऱ्या जागा शोधणे अजून सोईचे करायचे असल्यास, सेव्ह केलेल्या ठिकाणांना लेबल लावावे. त्यासाठी तुम्ही सेव्ह केलेल्या जागांमधील एक ठिकाण क्लिक करून त्यावरील लेबल पर्याय निवडून, तुम्हाला हवे ते नाव एडिट करून घ्या.
इतर वेबसाइट्सवरील ठिकाणे सेव्ह करणे : ‘गूगल मॅप्स’व्यतिरिक्त इतर वेबसाइटवर एखाद्या ठिकाणाचा गूगल मॅप लिंक केलेला असल्यास तुम्हाला तोसुद्धा थेट सेव्ह करता येतो.
ऑफलाईन अॅक्सेस : तुम्ही एखाद्या ठिकाणी जाणार असाल आणि तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला मॅप्सची मदत लागणार असेल, तर तो आधीच ‘डाउनलोड’ करून घ्या. त्यामुळे ऑफलाइन असतानादेखील तुम्हाला त्याचा वापर करता येऊ शकतो.
शेअर प्लेस : तुमची आवडती जागा तुम्ही इतरांसोबत शेअर करू शकता. त्यासाठी सेव्ह केलेल्या जागेची लिंक समोरच्याला शेअर करा.