सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया सर्फिंग पर्यंत आपल्या हातात सतत मोबाईल असतो. म्हणजेच आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात आणि शेवट मोबाईलनेच होतो. दिवसभरातील अनेक महत्वाची काम करण्यासाठी आपण मोबाईलचा आधार घेतो. म्हणजे एकुणच काय तर आपल्या दैनंदिन आयुष्यातील मोबाईल हा एक अविभाज्य घटक झाला आहे. आपल्यासाठी इतका महत्वाचा असणारा मोबाईल जर हरवला तर काय करायचे? मोबाईल कसा शोधायचा? या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच जणांना माहित नसते. मोबाईल हरवल्यानंतर तो ट्रॅक कसा करायचा याची एक सोप्पी ट्रिक आहे.

मोबाईल हरवल्यानंतर आपण पॅनिक होणं साहजिक आहे. अशावेळी मोबाईलमध्ये असणारे पासवर्डस, बँकिंग डिटेल्स यामुळे कोणी मोबाईलचा चुकीचा वापर तर करणार नाही ना? अशी चिंता त्या व्यक्तीला सतावते. त्यामुळे त्या वेळी काहीही सुचत नाही. तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा स्मार्टफोन मग तो अँड्रॉइड असो किंवा आयफोन जर हरवला तर अशा वेळी फोन ट्रॅक कसा करायचा जाणून घ्या.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड

आणखी वाचा : ‘ऑर्डर करू ना’ म्हणत किती पैसे उधळलेत? Swiggy ठेवतंय खर्चाचा रेकॉर्ड, ‘असा’ तपासून पाहा

मोबाईल ट्रॅक करण्याच्या स्टेप्स

  • मोबाईल हरवल्यानंतर दुसऱ्या कोणाच्या उपलब्ध फोनवरून किंवा इतर कोणत्याही डिवाईसमधुन सीईआयआर (CEIR) या वेबसाईटवर जा
  • तिथे तुम्हाला ब्लॉक (Block) हा पर्याय दिसेल तो निवडा.
  • हा पर्याय निवडल्यानंतर एक पेज दिसेल त्यावर तुमचा मोबाईल क्रमांक, आयएमईआय नंबर, स्मार्टफोनचे मॉडेल अशी मोबाईलची महत्वाची माहिती मागितली जाईल.
  • मोबाईलचा तपशील भरल्यानंतर तुम्हाला मोबाईल ट्रक करता येईल. तसेच ऍक्सेस ब्लॉककरून फोनचा वापर देखील थांबावता येऊ शकतो.
  • सीईआयआर या वेबसाईटवरून फोन ट्रॅक करण्यासाठी फोनचा पोलीस कंप्लेंट नंबर असणे आवश्यक आहे. जो तुम्हाला तक्रार नोंदवल्यानंतर दिला जातो.