आजच्या काळात इंटरनेटशिवाय कोणतेही काम करणे अवघड झाले आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवायची असली की आपण सर्वात आधी इंटरनेटचा आधार घेतो. अगदी कोणतेही नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरण विकत घ्यायचे असेल किंवा परदेशात एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे असेल तर आपण आधी इंटरनेटवरुन सर्व माहिती मिळवतो. त्यामुळे इंटरनेट नसेल तर काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात.
प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवण्यासोबतच सोशल मीडिया वापरण्यासाठी मोबाईलमध्ये डेटा असणे आवश्यक असते. दिवसभरात प्रवास करत असताना किंवा कामातून थोडा वेळ ब्रेक घेऊन सोशल मीडियावर वेळ घालवणे सर्वांनाच आवडते. पण यामध्ये रोज एक चिंता सतावत असते ती म्हणजे ‘डेली डेटा पॅक’ची. मोबाईलमधील रिचार्ज प्लॅनवर लिमिटेड इंटरनेट डेटा ऑफर असते. त्यामुळे इंटरनेट डेटा कधीकधी लगेच संपला असे आपल्याला जाणवते. असे का होते आणि यावर काय उपाय करता येईल जाणून घेऊया.
आणखी वाचा – कोणी गुपचूप तुमचा कॉल रेकॉर्ड करतय का? ‘या’ ट्रिक्स वापरून लगेच ओळखा
इंटरनेट डेटा सेव्ह करण्यासाठी वापरा या टिप्स
- आपण बऱ्याचदा युट्युब किंवा इतर ठिकाणी व्हिडिओ पाहतो, तेव्हा ते हाय कॉलिटीमध्ये दिसत असतात. त्यामुळे डेटा लवकर संपतो. इंटरनेट डेटाची बचत व्हावी यासाठी सेटिंगमध्ये जाऊन स्ट्रीमिंग कॉलिटीमध्ये बदल करा. ‘नॉर्मल कॉलिटी’ हा पर्याय निवडा.
- मोबाईल मध्ये ‘डेटा सेवर मोड’ ऑन करा. यामुळे डेटाची बचत होईल आणि जास्त वेळेसाठी तुम्ही डेटा वापरू शकता.
- मोबाईलमधले गरजेचे नसलेले ॲप्स डिलीट करा. बऱ्याच वेळा हे ॲप्स डेटा लवकर संपवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे हे ॲप्स डिलीट केल्याने एका दिवसासाठी उपलब्ध असणारा डेटा लवकर संपणार नाही.
- मोबाईलमधले ॲप मोबाईल डेटावर ऑटो अपडेट होत असतात. यामुळे बराचसा डेटा यात खर्च होतो. यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन ऑटो अपडेट ॲप्स ओवर वायफाय ओन्ली (Auto Update Apps Over Wifi Only) हा पर्याय निवडा. त्यामुळे ॲप्सच्या अपडेटमध्ये रोज उपलब्ध होणारा डेटा खर्च होणार नाही.