Search Particular Moment Youtube Video : गुगलने नवी दिल्ली येथील गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये अनेक मनोरंजक फीचर्सची घोषणा केली आहे. प्रेस्क्रिप्शनवरील डॉक्टारांचे हस्तलिखित ओळखण्यासाठी गुगल मदत करणार असून अँड्रॉइड फोनमध्ये प्री इन्स्टॉल डिजिलॉकर सेवा उपलब्ध करणार असल्याचे देखील गुगलने म्हटले आहे. त्यापैकी सर्वात लक्ष वेधणारे फीचर म्हणजे यूट्यूब व्हिडिओमध्ये विशिष्ट क्षण शोधता येणे. हे फीचर सध्या बिटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असून त्याची चाचणी केली जात आहे.

या फीचरद्वारे युजरला यूट्यूब व्हिडिओतील एखादी गोष्ट किंवा ठिकाण किंवा विशिष्ट क्षण शोधता येईल. उदाहरणार्थ तुम्ही जर हैदराबाद संबंधी व्हिडिओ पाहात असाल आणि तुम्हाला केवळ त्यातील चारमिनार आणि त्याचा परिसर पाहायचा असेल तर तुम्हाला केवळ व्हिडिओ खालील व्हिडिओ पर्यायातील सर्च या बटनीवर क्लिक करून त्यात केवळ चारमिनार टाकावे लागेल. या फीचरमुळे यूट्यूब व्हिडिओतील एखादे ठिकाण शोधण्यासाठी लागणारे परिश्रम आणि वेळ वाचेल.

father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kolhapur video Rankala Lake
“कोल्हापूरकरांसाठी सुखाचं एक ठिकाण म्हणजे…” कोल्हापूरातील लोकप्रिय ठिकाणचा VIDEO होतोय व्हायरल
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल

(डॉक्टरने प्रेस्क्रिप्शनवर काय लिहिले हे चटकन ओळखता येणार, Google करणार मदत, जाणून घ्या कसे?)

सध्या गुगल या फीचरची चाचणी घेत आहे. हे फीचर लवकरच युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकते. आम्ही तुमच्या फोनच्या सर्च अ‍ॅपवर व्हिडिओमध्ये सर्च करण्यावर काम करत आहोत. केवळ सर्च इन व्हिडिओ पर्यायाचा वापर करून तुमचे क्विरी टाका आणि तुम्ही नेमकं काय शोधत आहात ते सर्च करा, असे गुगलने म्हटले.

अँड्रॉइड फोनमध्ये Pre Installed असणार डिजिलॉकर

शासकीय, महाविद्यालीन दस्तऐवज ऑनलाइन सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिजिलॉकर स्टोअरेज सेवेचा वापर केला जातो. डिजिलॉकर अ‍ॅप उपलब्ध असून ते डाऊनलोड करून त्यात तुम्ही कागदपत्रे ठेवू शकता. परंतु, भविष्यात अँड्रॉइडमधील फाइल अ‍ॅपमध्ये डिजिलॉकर सेवा उपलब्ध करणार, अशी घोषणा गुगलने सोमवारी गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये केली आहे.

नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजनसह भागीदारीसह गुगलला लोकांना सरकराने जारी केलेली कागदपत्रे जसे पॅन, पासपोर्ट, आधार किंवा इतर कोणतीही कागदपत्रे सहजरित्या स्मार्टफोनमधून वापरू द्यायची आहेत. शेकडो फायलींमध्ये ओळखपत्र शोधण्यासाठी जो वेळ जातो तो वाचवणे हा या सहयोगामागचा विचार आहे.

फाइल्स अ‍ॅप वापरकर्त्याचे सरकारी दस्तऐवज ओळखण्यास सक्षम असेल आणि त्यांना एका सुरक्षित फोल्डरमध्ये संघटित करेल, असे गुगलने सांगितले. अल्गोरिदम फाइल्स अ‍ॅपमध्ये ठेवलेल्या डॉक्युमेंट्समधून युजरचा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड डेटा ओळखण्यासाठी सक्षम असेल, असे गुगलने स्पष्ट केले आहे.

(अडचणीत असताना शेअर करता येईल Location, अँड्रॉइड युजर्स ‘असे’ वापरा हे फीचर)

गुगलद्वारे फाइल्समध्ये संग्रहित केलेले दस्तऐवज डिव्हाइसवर एका वेगळ्या वातावरणात असतील आणि केवळ एका युनिक लॉकस्क्रिन ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यात प्रवेश मिळवता येईल, असे म्हटले जाते. याचा अर्थ केवळ युजर सोडून इतर कोणालाही दस्तऐवज वापरता येणार नाही.