Elon Musk यांनी गेल्या वर्षी ट्विटरची खरेदी केली आहे. ट्विटर खरेदी केल्यापासून त्यांनी कंपनीमध्ये अनेक बदल केले आहेत. अजूनही काही बदल करण्याच्या प्रयत्न ते करताना दिसत आहेत. अलीकडेच मस्क यांनी या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर मोठा बदल केला आहे. मस्क यांनी ‘Super Follow’ चे नाव बदलून ‘Subscription’ केले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आपला कंटेन्ट दाखवण्यासाठी प्रत्येक महिन्याला फॉलोअर्सकडून पैसे सुद्धा घेऊ शकणार आहेत.
एलॉन मस्क देखील हेच करणार आहेत. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी स्वतः एका ट्विटमध्ये सांगितले , ते दर आठवड्याला ‘Ask Me Anything’ नावाचे सेशन घेणार आहेत. त्यांच्या स्बस्क्रायबर्ससाठी ते खास असणार आहे.
कमावलेले सर्व पैसे तुमचे असणार
कंटेंट सबस्क्रिप्शनचे फिचर ट्विटर वापरकर्त्यांसाठी मॉनिटायजेशन टॅब अंतर्गत उपलब्ध असणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आपला कंटेन्ट दाखवण्यासाठी प्रत्येक महिन्याला फॉलोअर्सकडून पैसे सुद्धा घेऊ शकणार आहेत. मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कंपनी १२ महिन्यांपर्यंत कोणतेही कमिशन घेणार नाही. म्हणजेच कंटेंट सबस्क्रिप्शनद्वारे जेवढी रक्कम क्रिएटर मिळणार, ती संपूर्ण रक्कम केवळ क्रिएटर्सचीच असणार आहे. मात्र १२ महिन्यात जी रक्कम तुम्ही मिळणार आहात त्यापैकी १५ टक्के रक्कम तुम्हाला ट्विटरला द्यावी लागणार आहे.
ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी स्वतः एका ट्विटमध्ये सांगितले , ते दर आठवड्याला ‘Ask Me Anything’ नावाचे सेशन घेणार आहेत. त्यांच्या स्बस्क्रायबर्ससाठी ते खास असणार आहे.यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे अणि ३२५ रूपये मोजावे लागणार आहेत.
एलॉन मस्क ट्विटर विकणार ?
मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून मायक्रोब्लॉगिंग साइट आणि स्वत: मस्कने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. असे मानले जाते की मस्क ट्विटर विकत घेण्याबद्दल खूश नाहीत. याचे कारण म्हणजे मस्क यांनी कत्याच दिलेल्या एका मुलाखतीत योग्य व्यक्ती सापडल्यास ट्विटरची विक्री करू शकतो असे संकेत दिले होते.