सध्या भारतात काही वर्षांपासून स्मार्टफोनचे मार्केट खूप वाढले आहे. अनेक कंपन्या आपले नवनवीन अस्मार्टफोन्सचे मॉडेल्स लाँच करत असतात. आजकाल स्मार्टफोन काळाची गरज बनली आहे. आपले काम पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असते. काही अधिक फीचर्स असणारे स्मार्टफोन्स महागडे असतात त्यामुळे आपण ते खरेदी करू शकत नाही किंवा आपल्याला शक्य होत नाही. मात्र आज आपण बेस्ट फीचर्स असणारे स्मार्टफोन जे फक्त १५,००० रुपयांच्या आत तुम्ही खरेदी करू शकता हे जाणून घेऊयात.

देशात रिलायन्स जिओ आणि इंडियन एअरटेलने ५जी नेटवर्क लॉन्च केल्यानंतर, लोकांना ५जी मोबाइल फोन खरेदी करायचे आहेत. लोकांना ५G मोबाईल फोनमध्ये चांगला इंटरनेट स्पीड आणि चांगला कॉलिंग अनुभव मिळतो. मात्र, यासाठी तुमच्या परिसरात ५जी नेटवर्क उपलब्ध असणे आवश्यक आहे.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rbi received threatening phone call from Lashkar e Taiba
रिझर्व बँकेला ‘लश्कर-ए-तैयबा’च्या नावाने धमकी, कशी आणि कोणती धमकी दिली वाचा…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”

हेही वाचा : Smartphones खरेदी करण्याचा विचार करताय?, १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट फोन

Samsung Galaxy F14 5G

Samsung Galaxy F14 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. तुम्ही हा फोन १४,४९० रुपयांना खरेदी करू शकता. HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १,५०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. य्यमध्ये वापरकर्त्यांना ६६.६ इंचाचा डिस्प्ले अजनी ६,००० mAh ची बॅटरी आणि ५० मेगापिक्सल आणि ऑक्टकोअर प्रोसेसर मिळतो.

iQOO Z6 Lite 5G

iQOO Z6 Lite 5G ह स्मार्टफोन तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. हा फोन तुम्हाला १३,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. तसेच ५,००० mAh ची बॅटरी आणि ५० मेगापिक्सलचा कॅमेरा , ६.५८ इंचाचा डिस्प्ले वापरायला मिळतो. हा फोन तुम्हाला Mystic Knight आणि Steeler Green या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Redmi 11 Prime 5G

Redmi ११ प्राइम ५जी हा स्मार्टफोन देखील तुमच्यासाठी बजेटमधील चांगला स्मार्टफोन आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही १४,०९९ रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन Black, Grey आणि Silver या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता. ६. इंचाचा डिस्प्ले आणि ५००० mAh ची बॅटरी तसेच MediaTek Dimensity 700 चिपसेट, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा व ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असे फीचर्स मिळतात.

हेही वाचा : Twitter ने भारतातील तब्बल ६ लाखांपेक्षा जास्त अकाउंट्सवर घातली बंदी, कारण जाणून घेताच व्हाल थक्क

Poco M4 Pro 5G

Poco M4 Pro 5G या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. हा फोन तुम्ही १४,०० रुपयांना Amazon वर खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला ६.६ इंचाचा डिस्प्ले , ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ५,०००mAh ची बॅटरी व Mediatek Dimensity 810 प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो.

realme 9i 5G 

जर का तुम्ही रिअलमीचा एखादा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर realme 9i 5G हा स्मार्टफोन तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्न्सल स्टोरेज असणाऱ्या या मॉडेलची किंमत १४,९९९ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला ६.६ इंचाचा एचडी डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा व ५,००० mAh ची बॅटरी मिळणार आहे.