Apple आणि Microsoft या दोन कंपन्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांचे युजर्स खूप आहेत जे या सर्व्हिसचा वापर करतात. विंडोज ११ वापरणाऱ्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ती आनंदाची बातमी काय आहे ते आपण पाहुयात.
युजर्सना आता विंडोज ११ मध्ये सुद्धा अॅपल म्युझिक आणि अॅपल टीव्ही हे फीचर्स वापरायला मिळणार आहेत. ही युजर्ससाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर अॅपल म्युझिक आणि अॅपल टीव्हीचे प्रिव्हयु उपलब्ध आहेत.त्याशिवाय अजून एक अॅप आहे ते विंडोज स्टोअरवर आले आहे. हे अॅप अॅपल डिव्हाईसवर असून ते तुम्हाला विंडोजवर आयफोन आणि आयपॅड वापरून देईल.
मोठी सुट, २७ हजारांचे Airpods Pro फक्त १२०० रुपयांत; जाणून घ्या
हे अॅप तुम्हाला मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. कारण हे एक प्रिव्हयु असून कदाचित ते तुमच्या गरजेप्रमाणे काम करू शकणार नाहीत. अॅपल यावर अधिक काम करत आहे. जर तुम्ही अॅपल म्युझिक , टीव्ही हे प्रिव्हयु इंस्टाल केले तर तुम्ही itunes ओपन करू शकणार नाहीत.