भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफार्म Koo ने देखील आपल्या वापरकर्त्यांना आता Chatgpt हे फिचर उपलब्ध करून दिले आहे. Chatgpt हा एक AI chatbot आहे. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. OpenAI ने ChatGpt ची निर्मित केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या फीचरच्या मदतीने क्रिएटर्स आपल्या फॉलोअर्ससाठी आकर्षक आणि चांगलय पोस्ट लिहू शकणार आहेत. सध्या हे फीच फक्त व्हेरीफाईड अकाउंट आणि प्रसिद्ध लोकांसाठी उपलब्ध असणार आहे. लवकरच ते सर्वसामान्य लोकांसाठी सुरु करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ होळीच्या निमित्ताने तुमच्या फॉलोअर्ससाठी आकर्षक पोस्ट लिहायची असेल, तर तुम्ही चॅट GPT च्या मदतीने हे काम करू शकता. या एआय टूलच्या मदतीने तुम्ही तयार केलेली पोस्ट सर्वात अनोखी आणि आकर्षक असेल.

हेही वाचा : Microsoft पुढच्या आठवड्यात लॉन्च करणार ChatGPT-4; ‘हे’ असणार विशेष, जाणून घ्या

Koo अ‍ॅपचे सह-संस्थापक मयंक बिदावतका म्हणाले की, Koo अ‍ॅप्स नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यात आघाडीवर आहे. तसेच कंपनी क्रिएटर्सना हिताला व्यक्त करण्यासाठी मदत करण्यावर लसख केंद्रित करते. कू नेहमी त्याच्या वापरकर्त्यांसाठी कंटेंट प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी प्रयत्नकरत असते. आता ChatGPT सह क्रिएटर्स हेच करू शकणार आहेत.

Koo अ‍ॅप हे मार्च २०२० मध्ये भारतात लॉन्च करण्यात आले होते. हे अ‍ॅप २० पेक्षा जास्त भाषांमध्ये सपोर्ट करते. ट्विटरनंतर हे सर्वात मोठे दुसरे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. ट्विटरवर वापरकर्त्यांना व्हेरीफिकेशनसाठी पैसे मोजावे लागतात मात्र Koo हे मोफत करता येते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Users create and write post koo app help og chatgpt ai tool followers detail tmb 01