ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्याकडे आल्यानंतर होणारे वादविवाद थांबायचं नावच घेत नाही आहेत. ट्विटरचे मालक झाल्यानंतर मस्क यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. यामध्ये कर्मचारी कपात, कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांची हकालपट्टी, ट्विटरच्या ब्लु टिकसाठी युजरला पैसे मोजावे लागणार अशा अनेक निर्णयांचा समावेश आहे. यामुळेच युजर्सचा संताप होत असून ते ट्विटरला रामराम करत आहेत.
दरम्यान, या सर्व परिस्थितीचा एका कंपनीला झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, मास्टोडॉन (Mastodon) हे अॅप आता लोकांमध्ये पॉप्युलर होत आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात जवळपास २,३०,००० नव्या युजर्स या अॅपमध्ये सामील झाले आहेत. मास्टोडॉन ही एक ओपन सोर्स मायक्रो-ब्लॉगिंग साइट असून ते ट्विटरपेक्षा थोडे वेगळे आहे. त्याचे कार्य विकेंद्रित आहे. यामध्ये युजर मॅनेज्ड सर्व्हर देण्यात आले असून त्यात अनेक श्रेणीही दिलेल्या आहेत.
मस्क Twitterचे मालक झाल्यानंतर नेटकरी गुगलवर काय चर्चा करतायत पाहिलं का?
युजर्स आपल्या आवडीनुसार कोणत्याही सर्व्हरमध्ये सामील होऊ शकतात. सर्व सर्व्हरबाबत माहिती दिली जाते. तसेच, किती लोक आपले विचार व्यक्त करण्यासाठी या सर्व्हरमध्ये सामील झाले आहेत याची माहितीही तुम्हाला या अॅपमध्ये मिळते. यामुळे विशिष्ट सर्व्हरमध्ये किती लोक उपस्थित आहेत हेही कळते.
मास्टोडॉन अॅपमध्ये लॉगिन कसे करावे?
या अॅपमध्ये करण्यासाठी तुम्ही खाली स्टेप्सचा वापर करू शकता.
- अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर ‘Get started’ वर क्लिक करा.
- यानंतर सर्व्हर निवडा.
- अॅपचे नियम स्वीकारल्यावर तुम्ही ई-मेलच्या मदतीने तुमचे आयडी तयार करू शकता.
अॅपचा वापर कसा करावा?
मास्टोडॉन अॅपचा वापर करणे अतिशय सोपे आहे. तुम्ही एडिट बटनावर क्लिक करून काहीही पोस्ट करू शकता. तुम्हाला केवळ मेसेज टाइप करून तो पब्लिश करायचा आहे. ट्विटरप्रमाणे या अॅपमध्ये रिट्वीटला ‘रीब्लॉग्ड’ आणि लाइक्सला ‘फेव्हरेट’ म्हटले जाते.
युजर्स ते फॉलो करत असलेल्या अन्य युजरचा कंटेन्ट पाहू शकतात. याशिवाय ते एखाद्याला सर्चही करू शकतात. विशेष म्हणजे या अॅपवर पोस्टमधील अक्षरांची संख्या मर्यादा ५००० असल्याने, येथे तुम्ही तुम्हाला हवं ते सहज लिहू शकता.