देशातील सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना अशा स्वस्त आणि परवडणारे प्लान देण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. व्होडाफोन आयडियाच्या अशाच चार अप्रतिम प्रीपेड प्लॅनबद्दल बोलत आहोत, म्हणजेच व्होडाफोन आयडिया जे कमी किमतीत अनेक फायदे देत आहेत.
व्होडाफोन आयडियाचे हे खास प्लान
व्होडाफोन आयडिया कंपनी त्यांच्या ग्राहकांना जे प्लान ऑफर करतात, त्यापैकी बहुतेक कंपनीच्या विशेष अतिरिक्त फायद्यांसह प्लान येतात जे रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या प्लानमध्ये उपलब्ध नाहीत. या अतिरिक्त प्लानच्या फायद्यांमुळे व्होडाफोन आयडियाच्या योजनांना धमाकेदार बनवतो. तसेच यात २९९ रुपयांपासून प्लान सुरू होतात आणि ५९९ रुपयांचा चौथा आणि सर्वात महागडा प्लान तुम्हाला मिळतो.
व्होडाफोन आयडियाचे धमाकेदार प्रीपेड प्लान
व्होडाफोन आयडिया कंपनीच्या २९९ रुपयांच्या प्लानबद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर २८ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि १.५ जिबी डेली डेटा दिला जातो. तसेच ३९९ रूपयांचा असलेला दूसरा प्लान तुम्हाला ४२ दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस, दररोज १.५ जिबी डेली डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते.
व्होडाफोन आयडियाचा पुढील प्लान ४०९ रुपयांचा आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह हा प्लॅन तुम्हाला दररोज २.५ जिबी इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस असे फायदे मिळणार आहे. तसेच ५९९ रुपयांचा हा शेवटचा प्लान आहे. या प्लान मध्ये तुम्हाला दररोज १.५ जिबी डेली डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. हा प्लान ७० दिवसांच्या वैधतेसह येतो.
कंपनीचे या प्लानचे अतिरिक्त फायदे
आता या चार प्लानची खासियत म्हणजे या चार प्लानमध्ये ग्राहकांना कंपनीचे ‘Vi Hero Unlimited’ आणि ‘OTT’ फायदे मिळतात. Vi Hero Unlimited हे तीन फायद्यांसह येते, पहिला म्हणजे वीकेंड डेटा रोलओव्हर, दुसरा Binge All Night आणि तिसरा Data Delight. OTT फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या सर्व योजना Vi Movies and TV च्या अॅक्सेससह मिळणार आहे.
Vi Hero Unlimited फायदे
पहिला फायदा, ‘वीकेंड डेटा रोलओव्हर’ मध्ये, वापरकर्ते आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार आणि रविवारी डेटा वापरू शकतात जो आठवड्याच्या दिवसांमध्ये सेव्ह केला जातो, म्हणजेच आठवड्याच्या दिवसात वापरला जाणारा डेटा वाया जात नाही आणि तो दर आठवड्याला वापरता येतो. ‘बिंज ऑल नाईट’ हा एक फायदा आहे ज्यामध्ये वापरकर्ते दररोज रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अमर्यादित इंटरनेट वापरू शकतात आणि त्याचा संपूर्ण दिवसासाठी त्यांच्या डेली डेटा मर्यादेवर परिणाम होणार नाही.
तर हे व्होडाफोन आयडियाचे सर्वात धमाकेदार प्रीपेड प्लान आहेत, ज्यांची किंमत कमी तर आहेच,त्यानबरोबर तुम्हाला याचे अनेक फायदे देखील मिळतात.