वोडाफोन-आयडिया (Vi) ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅन्स लॉंच करीत असते. आता जे ग्राहक मोबाईलमध्ये फक्त एक महिन्याचा रिचार्ज करतात, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण- व्हीआय कंपनी ग्राहकांसाठी एक महिन्याच्या मोबाईल प्लॅनमध्ये विविध ऑफर्स देत आहे. आज आपण व्हीआयच्या या खास प्लॅनबद्दल जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वोडाफोन-आयडिया कंपनीने त्यांचा व्हीआय मॅक्स पोस्टपेड प्लॅन अपडेट केला आहे. व्हीआयच्या ५०१ रुपये किमतीपेक्षा जास्त असणाऱ्या सर्व पोस्टपेड प्लॅन्समध्ये स्विगी वनची सहा महिन्यांची (Swiggy One) मेंबरशिप मिळणार आहे. म्हणजेच व्हीआय ग्राहकांना दोन कूपन्स देण्यात येतील. त्यात स्विगी वनची तीन महिन्यांची मोफत मेंबरशिप असेल; ज्याचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.

हेही वाचा…कागदासारखा दिसणारा टॅबलेट भारतात लॅान्च! काय आहेत वैशिष्ट्ये एकदा पाहाच…

तर स्विगी वन ही फूड डिलिव्हरी ॲपची सदस्यत्व योजना काही निवडक रेस्टॉरंटमधून फ्री डिलिव्हरी, मेंबरशिप घेतलेल्या सदस्यांसाठी सवलत (डिस्काउंट) आणि स्विगी इन्स्टा मार्टकडून अमर्यादित फ्री डिलिव्हरी आदी गोष्टी ऑफर देण्यात येणार आहेत .

५०१, ७०१ व १००१ रुपये किमतीचे मोबाईल प्लॅन्स, १,१०१ रुपयांचा REDX प्लॅन व व्हीआय मॅक्स फॅमिली प्लॅन; ज्यांच्या किमती १००१ व १,१५१ रुपये अशा आहेत आदी सर्व प्लॅन्सवर कंपनी ही ऑफर ग्राहकांना देणार आहे. वरील सर्व मोबाईल प्लॅन्समध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि दररोज १०० एसएमएससह ३० दिवसांच्या कालावधीसाठी असणार आहे. तसेच १,१०१ या REDX प्लॅनमध्ये ॲमेझॉन प्राइम, डिस्नी प्लस हॉटस्टार, सोनी लाइव्ह आणि सन एनएक्सटी यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म, तसेच इझ माय ट्रिप (Ease My Trip), नॉर्टन ३६० मोबाईल सिक्युरिटी आणि Eazy डिनर सबस्क्रिप्शनचा समावेश असेल. या व्यतिरिक्त पोस्टपेड प्लॅनमध्ये Vi Mobies आणि टीव्ही ॲप, व्हीआय ॲपमधील हंगामा म्युझिक आणि व्हीआय गेम्समध्ये फ्री प्रवेशसुद्धा करता येणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vi company offers free swiggy one membership for six months on some max postpaid plans asp
Show comments