देशातील कुठलीही टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी नवनविन प्लॅन, ऑफर्स सादर करत असतात. मात्र, काही प्लॅन हे ग्राहकांना परवडणारे नसेल किवा कंपनीच्या सोईचे नसले की, त्या कंपन्या आपल्या धोरणांबाबत निर्णय घेत असतात. नुकतंच व्होडाफोन- आयडीया कंपनीने गुपचूप काही लोकप्रिय प्लॅन बंद केले आहेत.
काय आहे कारण ?
व्होडाफोन-आयडीया ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन ऑफर्स सादर करत असतात. परंतु, नुकतंच व्होडाफोन-आयडीया कंपनीने, कोणतीही माहिती किंवा कारण न देता, त्यांचे लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन, व्होडाफोन-आयडीया रिडक्स प्लॅन बंद केले आहेत. हे प्लॅन बंद करण्यामागचं नेमक कारण काय होतं हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, असं म्हटल्या जात आहे की, व्होडाफोन-आयडीया रिडक्स प्लॅन्सच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व प्लॅनची किंमत एक हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळं ग्राहक उदासीन होते.
आणखी वाचा : ‘त्या’ घडयाळानं वाचविला मुलीचा जीव; आईला अलर्टचा मॅसेज मिळालाच नसता तर…
1k च्या पुढंचे होते हे प्लॅन…
व्हीआयच्या यादीमध्ये एकूण तीन प्लॅन होते.
१.फ्लॅगशिप रिडक्स पोस्टपेड प्लॅन आहे. ज्याची किंम्मत रु.१ हजार ०९९ इतकी होती.
२.फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे. ज्याची किंमत रु.१ हजार ६९९ इतकी होती.
३.फॅमिली पोस्टपेड प्लॅन ज्याची किम्मत रु.२ हजार २९९ इतकी होती.
वरिल प्लॅन अॅप आणि वेबसाइटवर दिसत नसल्याने काही ग्राहकांनी याची तक्रारही केली आहे. मात्र. कंपनीने याबाबत अद्याप कोणतेही अपडेट दिलेले नाहीत.