देशभरामध्ये Reliance Jio आणि Airtel या टेलिकॉम कंपन्यांनी देशभरामध्ये आपले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. मात्र काही कारणांमुळे VI या कंपनीला आपली ५जी सेवा सुरु करता येत नाही आहे. त्यामुळे जिओ आणि एअरटेलशी व्हीआयला मोठी स्पर्धा करावी लागत आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कंपनीने आपला एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन काय आहे आणि यात ग्राहकांना काय फायदा मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

वोडाफोन-आयडियाचा १८१ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

VI ने आपला नवीन १८१ रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची असणार आहे. तसेच यामध्ये दररोज १ जीबी डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच ३०दिवसांसाठी तुम्हाला ३० जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे की ज्यांना चालू असलेल्या डेटासह एक्सट्रा डेटा हवा असेल. हा प्लॅन ४जी वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

Jio Ai Cloud Storage Welcome offer
Jio AI Cloud Welcome Offer : जिओ युजर्स तुम्हालाही हा एसएमएस आला आहे का? आता फोटो, व्हिडीओ सेव्ह करण्यासाठी मिळणार 100GB फ्री स्टोरेज
DOJ will push Google to sell Chrome
गूगलला Chrome ब्राउझर विकावं लागणार ? अमेरिकन न्याय…
3 steps to take after receiving a scam call
Spam Call : आता स्पॅम कॉल, मेसेजपासून होणार सुटका; सोप्या तीन स्टेप्स फॉलो करून सेकंदांत करा तक्रार
Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून

हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओच्या ‘या’ प्लॅन्समध्ये मिळणार डेली १.५ जीबी डेटा, जाणून घ्या

सर्वात महत्वाची टेलिकॉम कंपनीने नुकतेच २८९ रुपये आणि ४२९ रुपयांचे प्लॅन लॉन्च केले आहेत. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ७८ दिवसांची वैधता मिळते. तसेच कॉलिंग, डेटा आणि एसएमएस हे फायदे मिळतात.

२८९ आणि ४२९ रुपयांचे रीचार्ज प्लॅन

२८९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापकर्त्यांना ४८ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग सेवा आणि ४जी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनद्वारे तुम्ही ६०० एसएमएस करू शकणार आहात. ४२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंग, ६ जीबी डेटा, १०० एसएमएस करता येतात. ज्याची वैधता ही ७८ दिवसांची आहे.

हेही वाचा : Salesforce मधून नोकरी गेल्यावर महिला कर्मचारी भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “मला सुरुवातीला…”

महत्वाची गोष्ट म्हणजे वोडफोन-आयडिया कंपनीला अजून आपले ५ जी नेटवर्क सुरू करता आलेल नाही आहे. जिओ आणि एअरटेल यांनी ५ जी नेटवर्क सुरू केल्याने या कंपनीला मोठा फटका बसत आहे. झपाट्याने वापरकर्त्यांची संख्या कमी होत आहे.