Asteroid crashes into Earth Video: रविवार, २१ जानेवारीच्या सकाळी एका लहान लघुग्रहाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्याचे वृत्त सध्या समोर येत आहे. पूर्व जर्मनीतील आकाशात हा लघुग्रह चमकताना दिसून आला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, खगोलशास्त्रज्ञ आणि निरीक्षकांच्या मते, 2024 BX1 लघुग्रह, (ज्याला तात्पुरते Sar2736) म्हणून नाव देण्यात आले होते, हा स्थानिक वेळेनुसार पहाटे १ वाजून ३० मिनिटांनी बर्लिनच्या बाहेर नेनहौसेनजवळ दिसला होता. द इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या मते, हंगेरियन खगोलशास्त्रज्ञ क्रिस्टियान सार्नेक्झकी यांनी हा लघुग्रह विघटित होताना दिसण्याच्या अगदी काहीच तास आधी याचा शोध लावला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नासाने देखील हा लघुग्रह दिसण्याआधी किमान २० मिनिटे या घटनेची पुष्टी केली होती. एजन्सीने पोस्टमध्ये लिहिले होते की, “सावध व्हा! एक लहान लघुग्रह बर्लिनच्या पश्चिमेला नेनहौसेन जवळ लवकरच १:३२ CET वाजता निरुपद्रवी फायरबॉल म्हणून खाली येणार आहे. जर आकाश स्वच्छ असेल तर आपल्याला ही घटना पाहायला सुद्धा मिळू शकते.”

पृथ्वीवर आदळण्यापूर्वी लघुग्रह सापडल्याची घटना आठव्यांदा घडली आहे आणि क्रिस्टियान सार्नेक्झकी यांनीच असा शोध तिसर्‍यांदा लावला आहे.
Sárneczky हा एक सुप्रसिद्ध ‘लघुग्रह अभ्यासक’ आहेत, ज्यांनी पृथ्वीच्या कक्षात येणारे अनेक किरकोळ ग्रह आणि इतर अवकाशीय वस्तू शोधून काढल्या आहेत, ज्यात अनुक्रमे २०२३ मध्ये फ्रान्स येथे आदळलेले दोन लघुग्रह आणि २०२२ मध्ये आर्क्टिक महासागरात आदळलेला लघुग्रह यांचा समावेश आहे.

लघुग्रह किती मोठा होता?

कॅनडातील वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये उल्का भौतिकशास्त्रात विशेषज्ञ असलेले पीएचडी सहयोगी डेनिस विडा यांच्या म्हणण्यानुसार, लघुग्रह एका टोकापासून ते शेवटपर्यंत अंदाजे १ मीटर लांब होता. डेनिस विडा यांनी लघुग्रहाची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली होती जी मूळत: जर्मन शहर लाइपझिगमध्ये स्थित लाईव्ह स्ट्रीम कॅमेराद्वारे रेकॉर्ड केली गेली.

हे ही वाचा << ‘या’ देशाचं भारताच्या पावलावर पाऊल, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश, चौथ्या प्रयत्नात यशस्वी

हे फुटेज X वर पोस्ट करण्यात आले होते. विडा यांनी असा अंदाज वर्तवला होता की लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात पोहोचल्यावर फुटल्याने त्यातून उल्का निर्माण झाल्या असाव्यात. सीबीएस न्यूजला ईमेलद्वारे प्रदान केलेल्या अधिक स्पष्टीकरणात, विडाने नमूद केले की बर्लिनच्या पश्चिमेला अंदाजे ५० किलोमीटर (सुमारे 30 मैल) अंतरावर लघुग्रहाचे विघटन होऊ लागले होते. सुरुवातीला Sar2736 असे नाव देण्यात आलेल्या या लघुग्रहाला नंतर आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाच्या लहान ग्रह केंद्राने अधिकृत नाव दिले. अर्थस्कायने नोंदवल्याप्रमाणे या लघुग्रहाला 2024 BX1 असे नाव देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video asteroid crashes into earth over just hours after being discovered watch astronomical miracle that shine in sky coming at earth svs
Show comments