नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या भन्नाट स्मार्टफोन सीरिज लाँच केल्या आहेत. त्यामध्ये सॅमसंग Galaxy S24 सीरिज, OnePlus 12 सीरिज, Redmi Note 13 सीरिज व Realme 12 Pro 5G सीरिज ग्राहकांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मात्र, अजूनही तुम्हाला जर तुमच्या आवडीचे किंवा तुमच्या बजेटमध्ये बसणारे स्मार्टफोन्स मिळाले नसतील, तर या फेब्रुवारी महिन्यात अजून पाच नवेकोरे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. ते कोणते आहेत त्याबद्दल थोडी माहिती घेऊ.

हेही वाचा : Realme 12 Pro : ग्राहकांना तीस हजार रुपयांपेक्षा स्वस्तात मिळणार ‘एवढे’ फीचर्स! लाँच झालेल्या या स्मार्टफोनची खासियत पाहा

१. Nothing Phone (2a)

Nothing नावाच्या स्मार्टफोनने आता 2a सीरिज बाजारात आणणार असल्याचे सांगितले आहे. अजून या स्मार्टफोन लाँचची तारीख समजली नसली तरीही याचा हेडसेट लवकरच पदार्पण करणार असल्याचे समजते. तसेच, Nothing ने CMF बड्स आणि CMF नेकबँड प्रो उत्पादने भारतात आणणार असल्याचा सूचक इशारादेखील दिला असल्याची माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळाली आहे. या उत्पादनांमध्ये नवीन आणि खास फीचर्स असतील.

Nothing त्यांच्या 2a स्मार्टफोनचे येत्या MWC 2024 [ Mobile World Congress] मध्ये अनावरण करणार आहे, अशी सध्या चर्चा असल्याचे समजते. हा स्मार्टफोन काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन रंगांमध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये ८GB रॅम + १२८GB स्टोरेज असू शकते. त्याची किंमत अंदाजे ३७ हजार असू शकते.

२. iQOO Neo 9 Pro

iQOO Neo 9 Pro या मध्यम प्रीमियम रेंजचा स्मार्टफोन २२ फेब्रुवारी रोजी लाँच होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे, अशी माहिती मिळते. लाँचच्याआधी अमेझॉन लँडिंग पेजद्वारे मिळालेल्या माहितीनुसार आपण या स्मार्टफोनच्या काही फीचर्सबद्दल माहिती पाहू. या पेजनुसार या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट बसवण्यात आले आहेत. तसेच यामध्ये ८GB रॅम/२५६GB स्टोरेज व १२GB रॅम/२५६GB स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.

तसेच यामध्ये OIS सपोर्ट असणारा ५० मेगापिक्सेल सोनी IMX920 मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अॅँगल कॅमेरा दिलेला आहे. तसेच Neo 9 Pro स्मार्टफोनमध्ये ५१५०mAh आणि १२०W फास्ट चार्जिंगची बॅटरी बसवण्यात आल्याचे समजते.

हेही वाचा : अरेच्चा, Smartwatch आहे का स्मार्टफोन? ‘या’ डिव्हाईसमध्ये सोशल मीडिया ते गेमिंग सर्वांचा वापर करता येईल, पाहा…

३. Honor X9B 5G

Htech सह मिळू Honor भारतामध्ये आपल्या उत्पादनांची श्रेणी भारतमध्ये वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. तसेच या स्मार्टफोन बनवणाऱ्यांनी तो १५ फेब्रुवारीला लाँच करणार असल्याचे सांगितले आहे. हा स्मार्टफोन भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येही लाँच झालेला आहे. त्यामुळे याच्या फीचरबद्दल थोडी माहिती घेऊ

या स्मार्टफोनमध्ये ६.७८ AMOLED डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर, १०८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा फोन MagicOS 7.2 अॅण्ड्रॉइड १३ वर काम करतो.

४. Xiaomi 14 Ultra

Xiaomi 14 Ultra स्मार्टफोनदेखील फेब्रुवारी महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. याआधी Xiaomi 14 व Xiaomi 14 Pro ही मॉडेल्स मागील वर्षी म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये लाँच झाली होती. बार्सिलोनामध्ये २६ ते २९ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस [MWC] दरम्यान शाओमीचा हा नवा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : सावधान! ‘Android 14’ वापरकर्त्यांना फोन हॅकिंगचा सर्वाधिक धोका; काय आहे कारण जाणून घ्या…

५. Oppo F25 5G

ओप्पोची लोकप्रिय F सीरिज पुन्हा ग्राहकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा असल्याचे समजते. मात्र, ही सीरिज नवीन येणाऱ्या Reno 11F 5G चे रीब्रॅण्ड व्हर्जन असल्याचेही या चर्चेमध्ये बोलले जाते. OPPO F25 Android 14 वर आधारित ColorOS 14 वर हा स्मार्टफोन काम करील. त्यामध्ये ५,०००mAh शक्तीची आणि ६७W फास्ट चार्जिंग स्पीड असणारी बॅटरी असू शकते.
अशी सर्व माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळाली आहे.