जर का कोणाला Apple कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करायचे असतील तर एक आनंदाची बातमी आहे. कारण विजय सेल्स अ‍ॅपल प्रॉडक्ट्सवर विशेष डील्स आणि ऑफरसह एका आणखी Apple Days सेल घेऊन आले आहे. याची विक्री ४ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. यामध्ये खरेदीदारांना iPhone 14, iPhone 14 Plus, MacBook सिरीज आणि iPads यांसारख्या प्रॉडक्ट्सवर डील्स आणि डिस्काऊंटचा लाभ ऑनलाइन स्टोअर्ससह विजय सेल्स रिटेल स्टोअर्समध्ये देखील मिळणार आहे.

iPhone 14

iPhone 14 ज्याची किंमत ७९,००० रुपये आहे. १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटचे मॉडेल ६९,९०० रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. इतकेच नाही तर तुम्ही HDFC बँकेच्या कार्डासह ४ हजार रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळवू शकता. तसेच जर का तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्ही ३७ हजार रुपयांची बचत करू शकता. ज्यामुळे त्याची अंतिम किंमत ही ४२,९०० रुपये इतकी राहील. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Image Of Adani Power
Adani Power चे शेअर्स दोन दिवसांत २७ टक्क्यांनी कशामुळे वाढले? कंपनीने सांगितले कारण
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
cheapest electric car ligier mini ev could launch in 1 lakh rupees know features design battery details range
फक्त १ लाख रुपयात लॉंच होऊ शकते ‘ही’ इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर मिळेल १९२ किमीची रेंज
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
adani group stocks gains
Adani Group Shares: काल शेअर बाजार कोसळल्यानंतर आज अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; कारण काय?

हेही वाचा : Paytm Freedom Travel Carnival: विमान आणि बसच्या तिकिटांवर मिळणार ‘तब्बल’ इतका डिस्काउंट, ऑफर्स एकदा बघाच

iPhone 14 Plus

तसेच तुम्हाला iPhone 14 Plus वर देखील मोठी डील मिळवू शकता. ज्याची किंमत ७५,९४९ रुपयांपासून सुरू होते. तसेच HDFC बँकेच्या कार्डवर ४ हजार रूपयांचा अतिरिक्त कॅशबॅक ऑफरसह तुम्हाला आणखी बचतीचा आनंद मिळेल.

MacBooks

M1 चिप असलेले MacBook Air आता फक्त ७५,९०० रुपयांना उपलब्ध आहे. तर M2 चिप असलेले MacBook Air ची किंमत १,०१,९९० रूपयांपासून सुरू होते. १,११,९९० रूपयांपासून सुरू होणाऱ्या M2 चिपद्वारे समर्थित MacBook Pro सह तुमची उत्पादकता वाढवा. तिम परफॉर्मन्स शोधणाऱ्यांसाठी M2 प्रो चिप सह MacBook Pro ची किंमत१,७८,९९० रुपये आहे. या सर्व किंमती HDFC बँकेच्या कार्डांवर ५,००० रुपयांच्या कॅशबॅकसह येतात.

हेही वाचा : मोबाइलपेक्षा स्वस्त असणाऱ्या JioBook वर ‘या’ ठिकाणी मिळतोय मोठा डिस्काउंट, एकदा ऑफर्स पहाच

iPads

iPad 9th Gen ची किंमत फक्त २५,९९० रूपयांपासून सुरू होते. तर iPad 10th ची किंमत ३८,९९० रुपयांपासून सुरू होते. तसेच iPad Air 5th Gen देखील तुम्ही खरेदी करू शकता ज्याची किंमत ५१,९०० रूपये आहे. आयपॅड प्रो वर देखील डिस्काउंट मिळत आहे. ज्याची किंमत ७५,६७० रुपये आहे. तसेच तुम्ही यामध्ये HDFC बँकेच्या कार्डवर ३ हजारांचा कॅशबॅकचा आनंद घेऊ शकता.

विजय सेल्सच्या १२५ पेक्षा अधिक रिटेल आऊटलेटला किंवा त्यांच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमची आवडती apple प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.

Story img Loader