आयफोन १५ ( iPhone 15 ) सीरिज हे जुने आयफोन मॉडेल सध्या भारतात सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. विजय सेल्सने त्याचा ॲपल डेज (Apple Days ) सेल सुरू केला आहे; ज्यामध्ये ॲपलची अनेक उत्पादने सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. सेल सध्या भारतात लाईव्ह आहे ; हा सेल १६ जून रोजी संपेल. सेलमध्ये तुम्ही आयफोन (iPhone), आयपॅड (iPad), मॅकबुक (MacBook), ॲपल वॉच (Apple Watch), एअरपॉड्स (AirPods) आदी बरंच काही तुम्ही स्वस्तात मस्त खरेदी करू शकता. तसेच या खरेदीवर तुम्हाला ग्राहक लॉयल्टी पॉइंटदेखील मिळू शकतात. ग्राहकांच्या निवडक पेमेंट पद्धतींद्वारे त्यांना खरेदी केल्यावर अतिरिक्त ऑफर आणि फायदेदेखील मिळू शकतात.
विजय सेल्सने एका प्रेस नोटमध्ये सांगितले आहे की, सध्या सुरू असलेल्या Apple Days सेल दरम्यान, आयसीआयसीआय आणि एसबीआय बँक कार्ड ग्राहक दहा हजार रुपयांपर्यंतच्या सवलतींचा लाभ घेऊ शकतात. स्टोअर्समधील वॉक-इन ग्राहक १२ हजारपर्यंतच्या कॅशिबाय-बॅक्ड एक्स्चेंज बोनससाठी पात्रदेखील होऊ शकतात.
आयफोन १३, १४, १५ सीरिजच्या सेलमधील किमती –
१. आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस ७९,९०० आणि ८९,९०० रुपयांना लाँच झाला होता, तर या सेलदरम्यान ग्राहक हे आयफोन ६४,९०० आणि ७४,२९० रुपयांना बँक ऑफरसह खरेदी करू शकतात. आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स तुम्हाला या सेलमध्ये १,२३,९९० आणि १,४५,९९० रुपयांना बँक ऑफर आणि अतिरिक्त सवलतींसह मिळतील; ज्याची मूळ किंमत १,३४,९०० आणि रु. १,५४,९०० अशी आहे.
२. तसेच तुम्हाला या सेलमध्ये आयफोन १४ ऑफर्ससह ५७,९९० रुपये, तर आयफोन १४ प्लस ६६,९९० रुपयांना खरेदी करता येईल.
३. तसेच व्हॅनिला आयफोन १३ तुम्ही ५०,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.
इतर ॲपल प्रोडक्ट्स –
आयफोन व्यतिरिक्त तुम्हाला 9th जनरल आयपॅड २४,९९० रुपयांना आणि 10th जनरल आयपॅड २९,९०० रुपयांना मिळेल. तसेच 5th जनरल आयपॅड तुम्हाला ४५,४९० रुपयांना उपलब्ध असेल. तर 11-इंच आणि 13-इंच आयपॅड एअर व्हेरिएंट तुम्हाला ५३,००० आणि ७२,००० या सुरुवातीच्या किमतीत मिळून जाईल. तसेच 11-इंच आणि 13-इंच आयपॅड प्रो तुम्हाला ९१,००० आणि १,१९,५०० रुपयांना दिला जाईल. तसेच ही बाब लक्षात घेणे महत्वाचे आहे की, या सगळ्या किमती ऑफर्ससह असणार आहेत. M3 चिप असलेला १४ इंचाचा मॅकबुक प्रो तुम्हाला १,४७,८९० रुपयांना मिळणार आहे. तर ॲपलची वॉच सीरिज ९ आणि एअरपॉड्स प्रो (2nd Gen) ३६,६०० आणि २१,०९० रुपयांना ग्राहक खरेदी करू शकतात. तसेच ॲपल होम पॉड मिनी ८,३९० या सुरुवातीच्या किमतीपासून सेलमध्ये उपलब्ध असणार आहे.