१२ सप्टेंबर रोजी Apple ने आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. १८ तारखेपासून आयफोन १५ चे प्री-बुकिंग सुरु झाले होते. तर आजपासून भारतात आयफोन १५ सिरीजची विक्री सुरु झाली आहे. ज्या इच्छुक खरेदीदारांनी फ्लॅगशिप आयफोनचे प्री बुकिंग केले आहे ते फोनची खरेदी करू शकणार आहेत. आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५,आयफोन १५प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या आयफोन १५ सिरीजमध्ये कंपनीने अनेक नवीन अपग्रेडस दिले आहेत.आयफोनची विक्री सकाळी ८ वाजल्यापासून दिल्लीमधील साकेत आणि मुंबईतील Apple स्टोअर्समध्ये सुरु झाली आहे. दिल्ली आणि मुंबईमधील स्टोअर्स सुरु झाल्यानंतर हे पहिलेच आयफोन लॉन्चिंग आहे. काही जण तर नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून रांगेत उभे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

iPhone 15 वर अधिकृत ऑनलाइन स्टोअरमध्ये मिळणारा डिस्काउंट

जे खरेदीदार नवीन आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स खरेदी करणार आहेत त्यांना ६ हजारांचा झटपट डिस्काउंट मिळणार आहे. दुसरीकडे आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लसच्या खरेदीदारांना ५ हजारांचा कॅशबॅक मिळेल. HDFC बँकेचे कर वापरून व्यवहारकरणाऱ्यांसाठी फ्लॅट कॅशबॅक उपलब्ध असेल. या ऑफर्स जुन्या फोन मॉडेल्सवर देखील असणार आहेत. आयफोन १४ आणि १४ प्लसवर ४ हजारांचा डिस्काउंट , आयफोन १३ वर ३ हजारांचा डिस्काउंट आणि आयफोन SE वर २ हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : VIDEO: भारतात लॉन्च झाला विवोचा ‘हा’ स्मार्टफोन; २ हजारांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि…, फीचर्स एकदा बघाच

फ्लिपकार्ट

आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस खरेदी करणारे ग्राहक ईएमआय आणि नॉन ईएमआय या दोन्ही व्यवहारांसाठी HDFC च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून ५ हजारांचा तात्काळ डिस्काउंट मिळवू शकतात. जर का खरेदीदारांनी ईएमआयच्या व्यवहारासाठी HDFC बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरल्यास आयफोन १५ च्या १२८ जीबी स्टोरेज मॉडेलसाठी नो कॉस्ट ईएमआय ३,३३० रुपये महिना असा आहे. तथापि, HDFC च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून पूर्ण व्यवहार केल्यास खरेदीदारांना ४ हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे.

विजय सेल्स

विजय सेल्स HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डावर नो कॉस्ट ईएमआयसह ५ हजारांचा कॅशबॅक देखील देत आहे. HSBC च्या क्रेडिट कार्डावर विजय सेल्स ७.५ टक्के (साधारणपणे ७,५०० रुपये)चा डिस्काउंट ऑफर करत आहे. Yes बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना २ हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. IDFC फर्स्ट बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना ३हजारांची सूट मिळू शकते. Federal बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना १ हजारांची सूट मिळू शकते. विजय सेल्स HDFC बॅन कार्ड धारकांना प्रो मॉडेल्सवर ४ हजारांचा डिस्काउंट देत आहे.

हेही वाचा : iPhone 15 Series Sale In India: १७ तास रांगेत वाट पाहत उभे आहेत ग्राहक; या सिरिजमध्ये एवढे खास आहे तरी काय?

क्रोमा (Croma )

क्रोमा देखील फ्लिपकार्टपणेच डिस्काउंट देत आहे. आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस खरेदी करणाऱ्यांना HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांना ५ हजारांची सूट मिळणार आहे. आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स साठी HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांसाठी ४ हजारांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay sales flipkart croma apple stores iphone 15 series sale india check best offers and details tmb 01
Show comments