अ‍ॅपलने आपली नवी आयफोन १४ सिरीज लाँच केल्यानंतर १३ आणि १२ च्या किंमतींमध्ये मोठी घट दिसून आली आहे. त्यानंर आता सणासुदीचे दिवस असल्याने कदाचित आयफोन १४ वरही सूट मिळेल अशी अ‍ॅपलच्या चाहत्यांना आशा आहे. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण विजय सेल्समध्ये आयफोन १४ आणि १४ प्रो वर मोठी सूट मिळत आहे. ७९ हजार ९०० चा आयफोन १४ हा ग्राहकांना सूटसह ७४ हजार ९०० रुपयांना मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय सेल्सने दसरा सेल जाहीर केला आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठी सूट मिळत आहे. जर तुम्हाला कमी किंमतीमध्ये आयफोन १४ घ्यायचा असेल तर विजय सेल तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. एचडीएफसीच्या १५ हजारांवरील क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ३ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. तसेच, एचडीएफसीच्या १५ हजारांवरील नॉन ईएमआय क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर तातडीची १५ रुपयांची सूट मिळत आहे.

(21 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक, १२ तासांपर्यंत खेळता येणार गेम! रेडमी पॅड बाजारात घालणार धुमाकूळ, जाणून घ्या किंमत)

आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर इतकी सूट

आयसीआयसीआय बॅकेच्या २० हजारांवरली क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ग्राहकाला ३ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच ग्राहकांना नॉन ईएमआय ट्रान्झॅक्शनवर देखील १ हजार ५०० रुपयांची सूट मिळणार आहे. तर १ लाखांवरील इएमआय क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शनवर ५ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. ही ऑफर नॉन ईएमआय ट्रान्झॅक्शनला देखील असणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay sales offer discount on apple iphone 14 and 14 pro ssb