तुम्ही अ‍ॅप्पल उत्पादनांवर सूट मिळण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विजय सेल्समधील Apple Days ऑफरबद्दल जाणून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. अ‍ॅप्पल डेज सेल चांगल्या ऑफरसह विजय सेल्समध्ये ऑनलाइन आणि स्टोअरमध्ये उपलब्ध आहे . २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत हा सेल असणार आहे. या सेल्समध्ये आयफोन तसेच अ‍ॅप्पल वॉच सीरिज ७, एअरपॉड्स ३, एअरपॉड्स प्रो, मॅकबुक, आयपॅड्स आणि इतर उत्पादनांवर मोठी सूट मिळणार आहे. आयफोन १३ ची कमीत कमी रु. ६९,९०० इतकी आहे. जुना आयफोन एक्सचेंज केल्यास ही किंमत आणखी कमी होऊ शकते.

आयफोन १३ वरील ऑफर कशी जाणून घ्या?
विजय सेल्सने आयफोन १३ वर सर्वात मोठी ऑफर दिली असून ६१,९०० रुपयांपर्यंत हा फोन मिळू शकतो. आयफोन १३ ची किंमत ७९,९०० रुपये आहे. परंतु ७५,९०० रुपयांच्या डील किंमतीवर ऑफर केली जात आहे. याव्यतिरिक्त, एचडीएफसी बँकेचे ग्राहकांना कमाल ६ हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल. त्यामुळे किंमत ६९,९०० रुपयांपर्यंत येते. जर तुमच्याकडे जुना कार्यरत स्मार्टफोन असेल जो तुम्ही एक्सचेंज करू इच्छित असाल, तर विजय सेल्स ५ हजार रुपयांचे किमान एक्सचेंज मूल्य देत आहे. यामध्ये आणखी ३ हजार रुपयांची सूट दिली जाईल. त्यामुळे एकूण १८ हजार रुपयांची सूट मिळेल.

अ‍ॅप्पल डेज सेलमध्ये आयफोन १३ मिनी कमीत कमी ६०,४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १३ प्रोची किंमत १,०८,९०० रुपयांपासून सुरू होते. आयफोन १३ प्रो मॅक्सची किंमत १,१८,४०० रुपयांपासून सुरू होते. आयफोन ११ ची किंमत ४३,४०० रुपयांपासून सुरू होते आणि आयफोन १२ ची किंमत ५६,२०० रुपयांपासून सुरू होते. यात एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफर आहे. ग्राहक उत्पादनांवर १० हजार रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकतात. एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी ६ हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर आहे. आयफोन १३ मिनी ६ हजार रुपयांच्या कॅशबॅकसह उपलब्ध आहे, तर आयफोन १२, आयफोन १३ प्रो आणि प्रो मॅक्स ५ हजार रुपयांच्या कॅशबॅकसह उपलब्ध आहे. दुसरीकडे, आयफोन ११ चार हजार रुपयांच्या कॅशबॅकसह उपलब्ध आहे.

ProductOffer PriceCashback (Hdfc CC/DC)Effective Offer Price
iPhone 13७५,९००६,०००६९,९००
iPhone 13 mini६६,४००६,०००६०,४००
iPhone 13Pro१,१३,९००५,०००१,०८,९००
iPhone 13Pro Max१,२३,४००५,०००१,१८,४००
iPhone 11४७,४००४,०००४३,४००
iPhone 12६१,२९९५,०००५६,२९९
IPad 9th Gen२९,६००३,०००२६,६००
IPad Air 4th Gen५०,९००४,०००४६,९००
IPad Pro६७,५००४,०००६३,५००
Macbook Air with M1 Chip८३,६१०६,०००७७,६१०
Macbook Pro with M1 Chip१,१०,६१०७,०००१,०३,६१०
Macbook Pro with Latest M1 Pro Chip१,८१,२००१०,०००१,७१,२००
Apple Watch Series 7३९,१००३,०००३६,१००
Apple Watch Series SE२७,९००२,०००२५,९००
AirPods 2nd Gen१२,४००१५००१०,९००
AirPods 3rd Gen१७,३००२,०००१५,३००
AirPodsPro२०,४९०२,५००१७,९९०
AirPodsPro with Magsafe२२,९००२५००२०,४००
Airpods Max५०,९००५०,९००
Home Pod Mini९,४९०१,०००८,४९०

Airtel vs Jio vs Vi नवा प्रीपेड प्लान; ६६६ रुपयात ८४ दिवसांपर्यंतची वैधता, जाणून घ्या

सर्वात मोठी कॅशबॅक ऑफर मॅकबूकवर उपलब्ध आहे. मॅकबूक Air M1 ७७,६१० रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी ६ हजार रुपयांच्या कॅशबॅकसह येतो. मॅकबूक Pro M1 १,०३,६१० रुपयांत ७ हजार रुपयांच्या कॅशबॅकसह आहे. मॅकबूक Pro M1 Pro १,७१,२०० रुपयांमध्ये उपलब्ध असून १० हजार रुपयांचा कॅशबॅक आहे. अ‍ॅप्पल वॉच सीरिज ६ तीन हजार रुपयांच्या कॅशबॅक ऑफरसह ३६,१०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, अ‍ॅप्पल वॉच एसई २५,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे, यात २ हजार रुपयांचा कॅशबॅक आहे. एअरपॉड्स प्रो १७,९९० रुपयांत उपलब्ध असून २,५०० रुपयांच्या कॅशबॅक ऑफरसह येतो.

Story img Loader