Vivo आपल्या V-सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील महिन्यात आपला नवीन फोन Vivo V25 भारतात लॉंच करू शकते. या वर्षी Vivo ने आपली Vivo V23 सीरीज देशात उपलब्ध करून दिली आहे. Vivo V25, Vivo V25e आणि Vivo V25 Pro स्मार्टफोन नवीन Vivo V25 सीरीजमध्ये लॉंच होण्याची अपेक्षा आहे. Vivo V25 पुढील महिन्यात १८ ऑगस्ट रोजी भारतात लॉंच केला जाऊ शकतो. टिपस्टर योगेश ब्रार यांनी ही माहिती दिली आहे. पण कोणतीही अधिकृत घोषणा करण्यापूर्वी Vivo V25 चा फर्स्ट लुक समोर आला आहे. विवोचा हा फोन प्रसिद्ध क्रिकेटर विराट कोहलीच्या हातात दिसला आहे.

Virat Kohli Teased First Look Of Vivo V25
विराट कोहलीने त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर आगामी Vivo V25 चा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने ‘माय फेव्हरेट शेड ऑफ ब्लू’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये Vivo V25 विराटच्या हातात दिसत आहे. त्याच्या हातातला फोन हा ब्लू शेडमधला दिसत आहे. हँडसेटचा मागील पॅनल या चित्रात दिसत आहे आणि तो काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये लॉंच झालेल्या Vivo S15 Pro सारखा आहे. हे शक्य आहे की चीनी कंपनी Vivo S15 Pro चे रीब्रँड भारतात करेल आणि Vivo V25 म्हणून सादर करेल. यापूर्वी Vivo V12 आणि Vivo V12 Pro देशात Vivo V23 आणि Vivo V23 Pro म्हणून लॉंच करण्यात आले होते.

आणखी वाचा : वायरलेस चार्जिंगसह फ्लॅगशिप Samsung Galaxy S22 चा नवा अवतार, जाणून घ्या काय आहे खास?

Vivo S15 Pro Specifications
Vivo V25 बद्दल बोलायचे झाले तर Vivo S15 Pro चे स्पेसिफिकेशन फोनमध्ये आढळू शकतात. फोनमध्ये ६.६ इंचाचा फुलएचडी + एमोलेड डिस्प्ले असू शकतो. स्क्रीनचा रिफ्रेश दर १२० Hz असेल. फोनमध्ये MediaTek Dimension ८१०० प्रोसेसर, १२ GB पर्यंत रॅम आणि २५६ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळेल.

Vivo S15 Pro मध्ये ४५०० mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे जी ८० W फास्ट चार्जिंगसह येईल. हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध असेल. फोनमध्ये OIS सह ५० मेगापिक्सेल प्रायमरी, १२ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल आणि २ मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स असू शकतात. आगामी Vivo फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सुरक्षेसाठी डिव्हाईसमध्ये स्टिरिओ स्पीकर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असेल.

Story img Loader