Vivo phone 5g software update : देशात ५ जी सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल हे काही मोजक्या शहरात ५ जी सेवा देत आहेत. मात्र देशातील काही स्मार्टफोन्सना अद्याप ५ जी अपडेट मिळालेला नव्हता. अ‍ॅपल डिसेंबर महिन्यात भारतातील आयफोन युजरसाठी सॉफ्टवेअर अपडेट देणार आहे. त्यानंतर आता व्हिवो देखील आपल्या युजरसाठी या महिन्यात ५ जी सॉफ्टवेअर अपडेट देणार आहे. सॉफ्टवेअर अपडेट मिळाल्यावर ५ जी सेवा सुरळीतरित्या वापरता येणार आहे.

व्हिवोचे ५ जी फोन स्टँडअलोन आणि नॉन स्टँडअलोन या दोन्ही ५ जी नेटवर्कवर काम करतील, असे कंपनीचे म्हणणे आहे. देशात जिओ हे ५ जी स्टँडअलोन नेटवर्क देत आहे, तर एअरटेल हे नॉन स्टँडअलोन ५ जी नेटवर्क देत आहे. व्हिवोचे सध्या ३० स्मार्टफोन्स ५ जी सेवेला सपोर्ट करतात. हे फोन नॉन स्टँडअलोन ५ जी नेटवर्कवर चालू शकतात.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी

(नेटफ्लिक्सकडून युजर्सना मोठा धक्का! आता पासवर्ड शेअरींगसाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे)

कंपनीचे ६ पेक्षा अधिक फोन हे ५ जी स्टँडअलोन नेटवर्कला सपोर्ट करतात, आमचे बहुतांश स्मार्टफोन हे नॉन स्टँडअलोन नेटवर्कशी सुसुंगत आहेत. आम्ही या महिन्यात सॉफ्टवेअर अपडेट देणार आहोत, याने अनेक फोन्स स्टँडअलोन ५ जी नेटवर्कला सपोर्ट करू शकतील, अशी माहिती व्हिवो इंडियाचे बिझनेस स्ट्रॅटजी हेड पैघम दानिश यांनी दिली.

हे फोन्स ५ जी नेटवर्कला सपोर्ट करतात

Vivo X70 Pro+

Vivo Y72 5G

Vivo V23 5G

Vivo V23 Pro 5G

Vivo V23e 5G

Vivo T1 5G

Vivo Y75 5G

Vivo T1 Pro

Vivo X50 Pro

Vivo V20 Pro

Vivo X60 Pro+

Vivo X60

Vivo X60 Pro

Vivo V21 5G

Vivo V21e

Vivo X70 Pro

Vivo X80

Vivo X80 Pro

Vivo V25

Vivo V25 Pro 5G

Vivo Y55 5G

Vivo Y55s 5G

देशात सध्या केवळ दोनच दूरसंचार कंपन्या ५ जी सेवा देत आहेत. मुंबई, दिल्ली, वाराणसी, कोलकाता या शहरांमध्ये जिओची ५ जी सेवा मिळत आहे, तर एअरटेल ट्रु ५ जी देशातील ८ शहरांमध्ये ५ जी सेवा देत आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, सिलिगुडी, नागपूर आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे.