विवो (Vivo) एक प्रसिद्ध मोबाईल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन लाँच करीत असते. आता कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन विवो टी३ एक्स ५जी (Vivo T3x 5G) १७ एप्रिल रोजी भारतात लाँच करणार आहे. कंपनीचा नवीन फोन एप्रिल २०२३ मध्ये लाँच झालेलल्या Vivo T2x 5G शी स्पर्धा करणार आहे ; जो मीडिया टेक Dimensity ६०२० एसओसी आणि ५,००० एमएएच बॅटरीसह अनावरण करण्यात आला होता. तर लाँच पूर्वी नवीन स्मार्टफोनचे डिझाइन आणि किंमत समोर आली आहे. त्याचबद्दल या लेखातून आपण अधिक जाणून घेऊ या.
gadgets360 यांच्या वृत्तानुसार, विवो टी३ एक्स ५जी (Vivo T3x 5G) स्मार्टफोन Qualcomm च्या 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६ जेन १ एसओएसद्वारे सपोर्ट करेल. फोन सेलेस्टियल ग्रीन आणि क्रिमसन रेड कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार असेल. अलीकडेच विवोने पुष्टी केली की, नवीन विवो टी३ एक्स ५जी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा युनिटसह परिपूर्ण असेल व भारतात याची किंमत भारतात १५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असू शकेल.
तसेच या स्मार्टफोनमध्ये ४जीबी, ६ जीबी आणि ८ जीबी रॅम प्रकारांमध्ये १२८ जीबी ऑनबोर्ड स्टोरेजसह उपलब्ध असेल. तसेच स्मार्टफोनमध्ये १२० एचझेड रिफ्रेश रेटसह ६.७२ इंच फूल-एचडी प्लस डिस्प्ले असणार आहे. तसेच यामध्ये ८ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सोबत ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी बॅक सेन्सर कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 44W वायर्ड फ्लॅश चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 6,000mAh बॅटरी पॅक आहे. तसेच स्मार्टफोनला पाणी आणि धूळ पासून संरक्षण करण्यासाठी साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सरससाठी IP64 रेटिंग देण्यात आलेलं आहे. तर अशाप्रकारे तुम्ही १५ हजारात असे जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन लवकरचं खरेदी करू शकणार आहात.